शुक्रवार, ११ मार्च, २०१६

डाॕ.वसंत मराठे

// श्री स्वामी समर्थ //
    " डाॕ.मराठे "
    " UDCT"
मी कामाला लागलो त्या वेळी महाराष्ट्रात UDCT नावाची अत्यंत नावाजलेली केमीकल च्या संबंधित संस्था आहे याचा मला पत्ता हि नव्हता . या ठिकाणी शिकलेले परंतू इलेक्ट्रॉनीक्स मधे  करियर करणाऱ्या एका अद्भुत रसायना बरोबर मी 20 वर्षे काम केले. प्रत्येक गोष्टी बद्दल मूलभूत विचार स्पष्ट , कायम नविन गोष्टी शिकायची ओढ , बरोबरीच्या सर्वांना कायम प्रोत्साहन देणे , कितीही ताणततणाव असला तरी लाँजीकल थिंकींगचाच वापर,उत्तम दर्जा बद्दल कायम आग्रह , सर्व गोष्टी स्वतःच्या हाताने करुन बघणे , असामान्य एकाग्रता वगैरे गोष्टींबरोबरच उत्तम शारीरिक क्षमता आणि मानसीक लवचिकता होती.सर्वात महत्त्वाचे म्हणजे उत्तम विनोदाची जाण. आमच्या पेक्षा वयाने १५ वर्षांनी मोठे असूनही सगळ्यांची मते ऐकून नंतरच योग्य तो निर्णय घेण्याची हातोटी होती. कोणतेही  मशिन तयार करताना त्या मधे येणाऱ्या अपेक्षित आणि अनपेक्षित संकटांचा आधिच विचार करायची सवय त्यांच्यामुळे लागली.अतिशय साधे काम करणाऱ्या माणसाला सुद्धा एकाग्रतेने काम करु देणे.कोणाही समोर लाचारी न करणे .पैशाचा लोभ न ठेवणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःची सर्व कामे स्वतः करणे . यांच्या बरोबरीने  काम करणे म्हणजे उत्तम दर्जाच्या शास्त्रज्ञा बरोबरीने काम करण्यासारखे होते. विलक्षण अशी बुद्धिमत्ता आणि सहनशीलपणा असलेल्या डाॕक्टरांनी आपला अजातशत्रूपणा टिकवून ठेवला. खुप वेळ आणि विचार करुन केलेल्या कामा बद्दल  कोणत्याही प्रकारच्या कौतुकाची अपेक्षा न करता निरपेक्षपणाने पुढचे काम चालू.कामाचे समाधान नावाचे असंख्य धडे त्यांच्याकडूनच मला शिकता आले. अशा या  असामान्य व्यक्तीमत्वाला म्हणजेच डाॕ. वसंत मराठे यांना आरोग्यपूर्ण दीर्घ आयुष्य लाभो !
विनायक जोशी (vp)
10 October 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा