मंगळवार, ८ मार्च, २०१६

धूळ आणि धूळ !

// श्री स्वामी समर्थ //
   " धूळ आणि धूळ "
" Micro -Dust "
धूळ हा भारतीय माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे.लहानपणी ह्या धूळी मध्ये  निवांत बसून माती मधिल calcium खात धुळाक्षर गिरवीत शिक्षणाचा श्री गणेशा केला. सोलापूर मधे वळवाच्या पावसाची चाहूल ही धुळीच्या प्रचंड वादळांमुळे लागते. साध्या लाल गाडीतून प्रवास करताना रस्त्यावरची धूळ चाखायला मिळते.अनेक ठिकाणी पैलवान मंडळीना प्रतिस्पर्ध्यास धूळ चारताना बघितले आहे. अतिशय किरकोळ मतभेद न विसरता समोरच्या माणसाला धूळीला मिळविण्यासाठी धडपडणारे रथी महारथी बघितले आहेत . खाणींमधे Controlled Blasting करुन सुद्धा प्रचंड उडणारी धूळ अनुभवली आहे. १५० टन राॕ मटेरियल घेऊन  सायरन वाजवत जाणाऱ्या हेवी ट्रक्सची धूळ बघितली आहे. भर दिवसा पूर्ण शहरावर पसरलेल्या कोळशाची धूळ आणि त्याही स्थितीत स्थितप्रज्ञा सारखे राहणारे लोक बघायला मिळाले.  एकदा एका अत्यंत  स्वच्छ दिसणाऱ्या अशा औषधे बनविण्यासाठी प्रसिद्ध अशा कारखान्यात गेलो होतो.त्यावेळी अदृश्य स्वरुपातील  धूळ औषधांच्या काही घटकांच्या स्वरूपात Micro Dust म्हणून भेटली . या ठिकाणी  जास्त वर्षे काम करणाऱ्या मंडळींच्या मध्ये  Hormones चे बदल या धूळीमुळे घडतात वगैरे ज्ञान मिळाले. या वरुन एक गोष्ट स्पष्ट झाली कि दिसायला  स्वच्छ वाटणाऱ्या ठिकाणी सुध्दा ही धूळ मायक्रो स्वरुपात असते.
अजिबात धुराळा न उडवता हलक्या हातांनी  पुसलेली ही जुन्या आठवणीं वरची धूळ आहे !
विनायक जोशी (vp)
12 october 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा