शनिवार, १९ मार्च, २०१६

श्रीनिवास जाधव शिवाजी पार्क दादर

// श्री स्वामी समर्थ //
  " श्रीनिवास जाधव "
" शिवाजी पार्क" दादर या अतिशय उत्तम ठिकाणी बालपण आणि "बालमोहन" मधे शिक्षण .विजय गोखले वगैरे शाळेतील मित्र . बारावीला आगरवाल क्लासेस मध्ये  IIT साठी प्रवेश . बेफीकीर अशा तारुण्यामुळे आणि  अभ्यासाच्या प्रचंड  ताणामुळे अतिशय कमी मार्क्स पडले आणि पूर्ण आयुष्याची दिशा बदलली. या नंतर मात्र मुंबईचा आणि घरच्यांचा निरोप घेऊन पुण्यात शिक्षण पूर्ण केले . पुण्यात नवी पेठेत स्वतःच्या वाडयात जुन्या भाडेकरूंबरोबर नविन आयुष्याची सुरवात.याच वेळेला तो आमच्या कंपनीमधे आला.कामात अतिशय चोख.समोरच्या माणसाशी बोलताना गडगडाटी हसणे आणि आकाशा कडे बघत सिगरेटच्या धुराची वर्तूळे सोडत राहणे हि त्याची खासियत. सदोदीत मित्रांच्या  बरोबर परंतु स्वतःच्या  मस्तीत राहणारा.  कंपनीमधील मुलींचा अत्यंत विश्वासू मित्र .मेल्ट्राॕन मध्ये नोकरी मिळाल्या मुळे तिकडे गेला .मेल्ट्राॕनला घरघर लागल्यामुळे तिथून पूढे बजाज मधे. अनपेक्षितपणे तो काम करत असलेले विभाग बंद पडले.एका अत्यंत उमद्या आणि दिलदार माणसाला मनाविरूद्ध ची फकीरी करावी लागली. जुन्या भाडेकरूंमुळे त्याला स्वतःच्या वाडयात अंधारात दिवस काढावे लागले. एके दिवशी तो वाडा अनपेक्षित पणे विकला गेला. दिवस बदलले. आनंददायी असा संसार चालू झाला.आज त्याची मोठी मुलगी एका छानशा साॕफ्टवेयर कंपनीमधे नोकरी करत आहे. मुलगा सुध्दा उत्तम शिकत आहे.
लहानपणी सर्व गोष्टी पूरक असून सुध्दा पालकांशी मोकळा संवाद नसल्यामुळे या अत्यंत हुशार मुलाला सामान्य जीवन जगावे लागले. गेली २५ वर्षे पेपर मधे येणाऱ्या IIT च्या क्लासेसची जाहिरात वाचली की पहिली आठवण येते अत्यंत तल्लख अशा आणि  शिवाजी पार्क दादर येथे राहणाऱ्या ,बालमोहनच्या हुशार विद्यार्थ्याची म्हणजेच "श्री निवास जाधवची " !!!
       विनायक जोशी (vp)
        ७ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा