रविवार, ६ मार्च, २०१६

Assembly programming ची सुरवात

// श्री स्वामी समर्थ //
" Assembly  Software "
Assembly language मध्ये  काम करताना Hardware च्या क्षमतेची पूर्ण माहीती असेल तरच अतिशय छोटा आणि सर्व समावेशक असा
" programme code " लिहता येतो. Crystal आणि clock या विषयी कोणतीही संदिग्धता चालत नसे. Precision routines , Priorities , Interrupts वगैरे गोष्टींचा व्यवस्थित वापर करावा लागे. Watch dog timer किंवा लक्ष ठेवणारा कुत्रा यांना योग्य  ठिकाणी बसवावे लागे.सर्व इनपुट , आऊटपूट,टाईमर वगैरे आपापल्या जागेवर बसले की शेवटी keyboard  आणि display .एवढी तयारी झाली की पहिले " power on "मेसेजचे आचमन आणि नंतर टेस्ट मोड मधून सर्व Hardware शी संवादाची सुरवात.. एकदा इतकी तयार झाली की flow chart वगैरे मंडळींना हळूच चुकवून साॕफ्टवेअर लिहणे सुरु. पहिल्यांदा साधे सरळ लाँजिक चेक करणे .त्या नंतर on line monitoring आणि corrective actions साठी वेगळी routines . या सर्व गोष्टींचा रियाज करुन झाल्यावर  वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन्स चे लाँजीक आत्मविश्वासाने लिहणे चालू . हळुहळु Code Optimization वगैरे प्रकार जमायला लागले की Assembly मध्येच रममाण होणारा  हाडाचा शास्त्रीय गायक असावा तसा साॕफ्टवेअर इंजिनियर तयार होतो . Assembly नावाचे शास्त्रीय गायन करणाऱ्या या गायकाला  Higher level Software नावाचे 'पाॕप' संगीत कधीही आपले वाटत नाही.
अत्यंत श्रमपूर्वक शिकून मुक्त पणे  Assembly नावाच्या  गाण्याचा आनंद देणाऱ्यांवर लक्ष्मीची सुध्दा कायम कृपा असावी एवढीच इच्छा !
   विनायक जोशी (vp)
     23 July 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा