शनिवार, २६ मार्च, २०१६

" मीनी बाकरवडी " गणेश आणि योगेश

// श्री स्वामी समर्थ //
  ' मीनी बाकरवडी ''
" गणेश आणि योगेश "
आमच्या येथे मंगलधाम या बिल्डिंग मधे पहिल्या मजल्यावर गणेश रहायला आला.त्याचा मीनी बाकरवडी विकायचा व्यवसाय होता.
साधारणपणे एका छोट्या पिशवीत लहान आकाराच्या ५० -५५ अशा बाकरवड्या असतात. हडपसर मधील कारखान्यातून  बाकरवडी घेऊन पुण्यातील २०० ते २५० दुकानात स्कुटर वरून  नेऊन देणे हा गणेशचा व्यवसाय होता. गावाकडे अत्यंत ओसाड अशी थोडीफार शेती होती. बाकरवडीच्या व्यवसायात थोडासा  जम बसल्यावर त्याने हळूहळू शंकरपाळे वगैरे विकायला सुरवात केली.याचवेळी त्याचा छोटा भाऊ योगेश हा IT ची डीग्री घेऊन पुण्यात आपणही स्वतःचाच व्यवसाय चालू करायचा या तयारीने आला. त्याने ERP सारखेच Excise साठी ऊपयोगी पडणारे software तयार करायला सुरवात केली. त्या निमित्ताने Accounts पासून Taxation पर्यंतच्या वेगवेगळ्या लोकांची मते समजावून घेऊन साधारणतः वर्ष  भरात एक चालणारे Module तयार केले.या नंतर गिऱ्हाईकांकडे महत्त्व पटवून देण्यासाठीचे हेलपाटे वगैरे चालू होते.या मध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही.अर्थातच या क्षेत्रात काहीही प्रगती होत नसल्याचे दिसताच  फार वेळ न दवडता त्याने इंग्रजी संभाषण आणि व्यक्तीमत्व विकास या विषयीचा क्लास जाॕईन केला.त्या ठिकाणी मिळालेल्या मार्गदर्शनाचा फायदा करुन घेऊन एका Call center मध्ये जाॕब मिळवला.  नोकरी मध्ये जाणीव पूर्वक communication skills वाढविण्यासाठी जास्त मेहनत घेतली.त्या नंतर सिंगापूर मधील एका कंपनीमधे out sourcing चे काम होते तेथे जाॕईन झाला. पुढे  २-३ वर्षां साठी सिंगापूरला  नोकरीसाठी राहीला. या नोकरीमुळे उत्तम प्रकारचे आर्थिक स्थैर्य आले. याच दरम्यान दोघांची लग्ने झाली.योगेश सिंगापूर मध्येच  राहिला. या नंतर मात्र दोन्ही भावांनी मिळून पुण्यात दोन स्वतंत्र फ्लॅट  घेतले.मंगलधाम या इमारती मध्ये भाड्याने रहाणारे हे दोन भाऊ अतिशय उत्तम पणाने, संयमाने आणि कष्टाने चांगल्या सुस्थितित पोचले. सिंगापूर मध्ये नोकरी करत असलेल्या  योगेश चे मोठे बंधू "गणेश शेठ" आता चारचाकी गाडीतून "मीनी बाकरवडी " देऊन गिऱ्हाईकांना संतुष्ट करत आहेत.! दहिवळ दादांच्या वास्तूने त्यांना तथास्तु असा आशीर्वाद दिला आहे !!
        विनायक जोशी (vp)
            २१ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा