रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

सहृदयी हृदयाचा पंप

 // श्री स्वामी समर्थ //


  *सहृदयी हृदय*


विनायक जोशी (vp)

💬9423005702 

📱9834660237 


 हृदय नावाचा एक सहृदयी पंप आपल्या प्रत्येकाच्या शरीरात कार्यरत आहे. शुद्ध रक्त सर्व शरीरभर योग्य दाबाने पाठवणारा हा पंप हे सामान्य माणसासाठी फार मोठे कोडे आहे. 


या पंपाला परमेश्वराने स्टार्ट करुन आपल्याला दिला आहे. या पंपाचा वेग मात्र माझा *मी* पणा कंट्रोल करत आहे. 


माझा सर्व आनंद मला मिळणाऱ्या  "आदर " या गोष्टी भोवती केंद्रित आहे. चुकून जरी कोणीही विरोध केला किंवा "अपमान " केला की संतापाने या पंपाचा वेग वाढतो. त्या मुळे *जास्त दाबाने* रक्त प्रवाह सर्व बारीकसारीक रक्तवाहिन्यां मधून वाहायला लागतो.


 या मधील काही नाजूक नळ्या या जास्त दाबामुळे फुटतात . अर्थातच हे फुटलेले पाईप नैसर्गिक रीतीने दुरूस्त केले जातात आणि बहूतेक वेळेला या कामा मधूनच  Blockages किंवा अडथळे  तयार होतात. 


आपल्या शरीरातील हा पंप दिर्घ काळ व्यवस्थित चालू ठेवण्यासाठी चालणे , व्यायाम वगैरे गोष्टींच्या बरोबरच आपल्या अपेक्षां मध्ये थोडासा बदल करायची तयारी पाहिजे  .


वयाची ५५ वर्षे  ओलांडून पुढे गेलेल्या मंडळींनी कोणतीही गोष्ट सिद्ध करायच्या भानगडीत पडू नये. सर्व ठिकाणी आपले स्वतःचे काम स्वतः करणे. साफ सफाई कामगारांच्या पासून ते उच्चपदस्थ मंडळीं पर्यंत सर्वांच्या कामाचा आदर राखणे. जास्तीत जास्त शारीरिक कष्ट आनंदाने करणे हे जरुरीचे आहे.


 

पु.ल. देशपांडे , लता मंगेशकर , श्रीनिवास खळे , मंगेश पाडगावकर , भिमसेन जोशी वगैरे असंख्य मंडळींनी अपरंपार आनंदाचा ठेवा आपल्यासाठी ठेवला आहे त्याचा मनापासून आस्वाद घेणे. 


 आपल्या आसपास घडणाऱ्या छोट्या मोठ्या गोष्टींना उत्साहाने दाद देऊन आनंदी रहाणे . अशा गोष्टीं मधूनच आपल्या हृदयाचा पंप कमी किंवा जास्त असे भावनिक धक्के उत्तम रीतीने सहन करुन कार्यक्षमतेने चालू शकतो .


 कायम सकारात्मक विचार करुन या पंपाला निवांत राहू द्यायचे एवढेच आजच्या दिवशी स्मरण ठेवायचे

👍❤👍


   *विनायक जोशी (vp)*

   💬9423005702

   📱9834660237 

 मंगलधाम , बी३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१. 

*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा