रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

गौरी दामले यांचे अकोल्यातील घर

 // जय गजानन //

 *गौरी*

 संत गजानन महाराजांचे फक्त पंधरा मिनीटात अतिशय शांतपणाने दर्शन झाले. घरच्या मोदकांचा आणि करंज्यांचा मला नैवेद्य दाखवता आला. या नंतर विनाथांबा बसने आम्ही तुमच्या घरी गेलो. अतिशय ऊत्साहाने व आनंदाने आई आणि आज्जी आमची वाट बघत होत्या. या नंतरचे दोन तास कसे गेले ते कळलेच नाहीत. तुमच्या प्रसन्न घरातील व्हरांडा हा तेथे एकेकाळी असलेल्या लायब्ररीची आठवण करून देत होता. प्रशस्त हाॕल आणि त्या ठिकाणी कोपऱ्यात असलेला गणपती , याच बरोबर दगडावर रंगवलेली नृसिंहसरस्वतींची मुर्ती किंवा माळ्यावरती असलेल्या नैसर्गिक अशा लाकडी आकाराच्या वस्तूं मधील हत्ती किंवा गणपती याच बरोबर हूबेहूब दिसणारा साप वगैरे बघितले . अतिशय स्वच्छ आणि टापटीप असलेले स्वयंपाकघर किंवा त्याच्या समोर असलेली बेडरूम आणि त्याच्या पलीकडे भारदस्त अशी कोठीची खोली . मागच्या बाजूला धूण्याचा दगड , बोअरची मोटार याच बरोबर तेथे शांतपणे उभा असलेला गोडलींब किंवा कढिलींब आणि लिंबाचे दर्शन घडले. वरच्या मजल्यावर राहणाऱ्या समजूतदार अशा भाडेकरूंची सोबत छानच आहे. घराच्या प्रवेशद्वारातच असलेली आणि लहान लाल टोमॕटो सारखी दिसणारी मिरची , जवळच असलेला जास्वंद वगैरे झाडां प्रमाणेच कडूनिंबाच्या छायेत ऊभा असलेला झोपाळा बघितला. आई आणि आज्जींनी वेगवेगळ्या पदार्थांचा जबरदस्त आग्रह केला. चैतन्य आणि समाधानाने ओतप्रोत भरलेल्या त्या वास्तूतून बाहेर पडताना कमालीची शांतता अनूभवता आली. आज्जींनी अतिशय उत्तम ठेवलेली ही जून्या पध्दतीची वास्तू मनापासून  सांभाळून ठेवणे हे नवीन पिढीचे काम आहे.


*विनायक मामा*

२६ / ११ /२०१७

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा