// श्री स्वामी समर्थ //
*बुट एक*
*जिवलग साथीदार*
👟👟
*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
तळजाईच्या टेकडीवरती साधारणपणे १३५० ते १४०० पाऊले चालणे झाले कि एक किलोमीटर होतो आणि ६९०० पाऊले चाललो की ५ किलोमीटर. असे महिनाभर चालणे झाले म्हणजे साधारणपणे दोन लाख पाऊले होतात. वर्षाला २५ लाख पाऊले .
डांबरी रस्ता , सिमेंटचा रस्ता , मातीचा रस्ता , चिखलाचा रस्ता , दगडगोट्यांचा रस्ता , चढ उताराचा रस्ता अशा सर्व ठिकाणी कमालीचा आत्मविश्वास देणारा क्रमांक एकचा साथीदार म्हणजे आपल्या पायातल्या बुटांची जोडी. कधीही आणि कोणत्याही प्रकारे दगाफटका न करणारे , परिस्थिती प्रमाणे लवचिकता दाखवणारे असे हे बुट . आदिदास , नायके वगैरे वंशावळीतले आणि दोन ते तीन हजारां मध्ये मिळणारे हे बुट आम्हाला साधारणपणे दिड वर्षे किंवा ३७ लाख विश्वासाची पावले टाकायला प्रेरीत करतात .
या नंतर त्यांना आनंदाने निरोप वेगवेगळ्या अनुभवांच्या आठवणीसह देतो .
निरोपाच्या दिवशी लेस काढून वेगळी करायची आणि त्याला सन्मानाने बंधमुक्त करायचे . *त्याच्या नवीन वंशजाला त्याच्या जवळ ठेवून फोटो काढायचा आणि एक पूर्ण दिवस दोघांना एकमेकांच्या जवळ ठेवायचे .प्रदीर्घ अनुभवाचे बोल ऐकण्यासाठी फक्त*....
.👟👟👟👟
*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
१२५७ ,मंगलधाम , बी ३, विठ्ठलवाडी हिंगणे खुर्द,लेन नं ४
पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा