रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

मनाली नारायण जोशी सिंबायोसिस इंटरनॅशनल ४ नोव्हेंबर २०२०

 //श्री स्वामी समर्थ// 


     *मनाली नारायण जोशी*


४ नोव्हेंबर १९९७चा जन्म . तिचे बाबा अल्ट्राटेक या कंपनीत सिनियर व्हाईस प्रेसिडेंट आहेत. बाबांच्या नोकरीच्या निमित्ताने वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळां मधून शिक्षण पूर्ण .


 दहावीला उत्तम मार्क मिळाल्यावर जाणीवपूर्वक सायन्सला प्रवेश घेतला नाही .

बारावी नंतर सिंबायोसीस इंटरनॅशनल येथे प्रवेश घेतला . 


Law कॉलेजच्या दुसऱ्याच वर्षात राष्ट्रीय पातळीवरील "मुट" या स्पर्धेत पहिला क्रमांक मिळवला . राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विषयांवर ४० पेक्षा जास्त लेख एका वर्षात लिहिले. 


वडिलांची हुशारी आणि आईची सहनशक्ती यांचा मिलाफ म्हणजे "मनाली"...अतिशय कडक मेहनत घेऊन प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत तिने दिल्ली येथील Clarus Law Associates या फर्म मध्ये नोकरी मिळवली आहे आणि सध्या ती वर्क फ्राॕम होम करत आहे .

आज वाढदिवसा निमित्ताने  आमच्या कडून मनालीला मनःपूर्वक शुभेच्छा 

💐💐🎂🎂💐💐


विनायक काका आणि कल्याणी काकू

४ नोव्हेंबर २०२०

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा