रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

वेळणेश्वर समुद्र

 // श्री स्वामी समर्थ  //

        श्रावण

      *वेळणेश्वर समुद्र*

        12/08/2020

    

   *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

  📱9834660237 


शिवाजीपार्क दादर येथे राहणाऱ्या चितळे यांच्यामुळे अथांग अशा समुद्राचे पहिले दर्शन झाले . पंचमहाभुतांपैकी पाण्याचे महत्व अधोरेखित करणारा तो अथांग सागर ... नारायण जाफराबाद अल्ट्राटेकला होता त्यावेळी जाफराबादचा समुद्र शांतपणे बघता आला . दीवचा समुद्र बघितला . त्यामुळे वेळणेश्वरला जायच्या आधीची पूर्व तयारी झालेली होती.


वेळणेश्वराच्या समुद्राच्या किनाऱ्यावर पोचलो आणि पहिली आठवण अगस्ती ऋषींची आली.


आठ वर्षे जाफराबादच्या समुद्राजवळ राहिलेल्या नारायणला बघून असंख्य लाटा अतिशय वेगाने आणि आनंदाने आमच्या कडे झेपावल्या आणि परत जाताना दीव आणि जाफराबाद मधील आपल्या भावंडांची खुशाली विचारून परतल्या. येणारी प्रत्येक लाट एका वेगळ्याच आणि सर्व समावेशक आनंदाची अनुभूती देत होती.


या किनाऱ्यावर कृत्रीम आनंदाच्या कोणत्याही गोष्टी नव्हत्या. सोमरस प्राशन करून येणाऱ्यांना येथे बंदी होती. लखलखणाऱ्या फेसाळलेल्या लाटा आणि पायाखालून सरकणारी बारीक वाळू या दोन्हीही प्रकारांचा मनमुराद आनंद घेत दोन तीन तास कसे गेले ते कळलेच नाही.


साधारणपणे सायंकाळी पाच वाजता आम्ही काठावर येऊन ओळीने थांबलो.दूर अंतरावरा क्षितीजा वरती ३-४ बोटी एकाचजागी डुलत उभ्या होत्या.


त्या बोटीं बद्दल , तेथे असलेल्या पाण्याच्या खोली बद्दल , हजारो टन सामानाची चढ उतार करताना बोट बॕलन्सिंगचे महत्त्वाचे काम करणाऱ्या कप्ताना बद्दल , दररोज येणाऱ्या भरती आणि ओहोटी बद्दल किंवा पौर्णिमेला आणि अमावस्येला स्वभावातील वेगळेपणा दाखवणाऱ्या समुद्राच्या बद्दल , लांबूनच बोटींना दिशा दाखवणाऱ्या दीपगृहा बद्दल नारायणने स्पष्ट आणि स्वच्छ माहिती सांगितली. 


संध्याकाळी साडेपाच वाजता त्या अत्यंत तेजस्वी आणि अथांग अशा सागराचा निरोप घ्यायची वेळ आली. "ने मजसी ने परत मायभूमीला" हे महाकाव्य लिहिणाऱ्या प्रखर देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांची तीव्र आठवण झाली.


अत्यंत अनपेक्षित आणि आनंददायी अश्या वेळणेश्वरांची एक दिवसाची यात्रा पूर्ण झाली होती.


येताना परत एकदा मर्यादा पुरुषौत्तम असून सुध्दा वेळप्रसंगी हातात परशु घेतलेल्या परशुरामांचे दर्शन झाले. बरोबर तीन वर्षांनी एकत्र जमलेल्या कुटुंबातील सर्व आनंदयात्रींनी कमालीच्या उत्साहाने परत कोकणात यायचेच असा ठराव पास केला आणि  कऱ्हाड कडे परत निघालो.......

🐚🐚🐚

 

१२ मे २०१८ संध्याकाळचे ५

*विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

  📱9834660237 

  १२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी ,हिंगणेखुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा