// श्री स्वामी समर्थ //
*आनंदयात्री*
*आशिष दायमा*
📱9923876856
मार्केटींग मॕनेजर
एलटेक
१६/१०/२०२०
विनायक जोशी (vP)
📱9423005702
परभणीच्या जवळील सेलू हे आशिषचे गाव . ढोलकी , बासुरी , हार्मोनियम वगैरे उत्तम वाजवणारे आणि नाटकात काम केलेले रसिक असे वडील , कृष्णं शरणं मम असा ध्यास असलेली किंवा हनुमान चालीसा म्हणणारी आणि अखंड कामात व्यस्त असलेली आई , चार प्रेमळ बहिणी आणि नऊ भाच्यांच्या सहवासात आनंदाने रहात असलेला आणि महर्षि दधिची ऋषींचा कृपाशिर्वाद लाभलेला असा हा *आशिष दायमा*
जयसिंगपूर येथील मगदूम काॕलेज मधून इंजिनियर झालेला , हैद्राबाद येथे औषधाच्या कंपनीत पहिली नोकरी करणारा , साधारणपणे ३ वर्षे सांगलीत स्वतःचा इलेक्ट्रॉनिक्स मधील व्यवसाय करणारा तरुण उद्योजक म्हणजे आशिष.
त्यानंतर भविष्या बद्दल व्यावहारिक दृष्टीकोन बाळगून तो पुण्यात आला . सेटको स्पिंडल्सचे मॕनेजिंग डायरेक्टर राजेश मंडलीक यांच्या ओळखीमुळे इंडिटेक मध्ये त्याचा प्रवेश झाला. इंडीटेक या कंपनीत श्री.कट्टी या अनुभव समृद्ध सरांच्या मार्गदर्शना खाली मार्केटींगचे मुलभुत धडे गिरवून तो तयार झाला.
सध्या एलटेक या कंपनीत विजय बढे यांच्या कल्पनेतील औद्योगिक मार्केटींगसाठी सर्वस्व झोकणारा , आनंदी व पाॕझिटीव्ह व्यक्तीमत्व असलेला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे अत्यंत आनंदी अशा *मेघना* बरोबरच सात महिन्यांच्या छोट्याशा *उर्जा* मुळे प्रचंड उत्साह प्राप्त झालेला अशा *आशिषला २८व्या वाढदिवसा निमित्त अनेक शुभेच्छा*
💐💐🎂🎂💐💐
विनायक जोशी (vp)
📱9423005702
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा