// श्री स्वामी समर्थ //
*मोबाईल बँकिंग*
विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237
बँकिंग या विषयातील मी तज्ञ नाही . तज्ञ मंडळींनी मोबाईल बँकिंग या गोष्टींबद्दल आपले स्पष्ट मत मांडावे ...
चेक बुक , डेबिट कार्ड , क्रेडिट कार्ड असे करत करत आपण भारतीय बनावटीचे रुपे कार्ड वगैरे प्रकार वापरत आहोत .....
सध्या काही राष्ट्रीयकृत बँकांनी डेबिट कार्ड शिवाय पैसे काढता येतील अशी ATM चालू केली आहेत .,
*Digital Payment व्यवहार ही अत्यंत उपयुक्त आणि जरुरीची गोष्ट आहे*. त्या मधील खाचाखोचा समजून घेऊन आणि योग्य त्या सुरक्षितता पाळून वापरणे महत्त्वाचे आहे ...
याच बरोबर नेट बँकिंग नावाचा प्रकार अनेक वर्षे चालू आहे . सध्याच्या काळात मोबाईल बँकिंग आणि याच बरोबर 24 * 7 घरबसल्या पैसे ट्रान्सफर करणारे upi याचा वापर भरपूर चालू आहे
या मोबाईल बँकिंग साठी आपल्याला आपल्या खात्याला रजिस्टर्ड केलेला मोबाईल नंबर द्यावा लागतो आणि त्याच्या रेफरन्सनेच पुढचे सर्व व्यवहार घडतात ....
मोबाईल बँकिंग साठी यूजर नेम हे फोन नंबर आहे आणि पासवर्ड किंवा पिन नंबर ४ आकडी फक्त .
वेगवेगळ्या संस्था अत्यंत आकर्षक पध्दतीने *कॕशबॕक* हे गाजर आपल्या तोंडासमोर धरतात आणि त्यांचेच अॕप वापरायची सवय लावतात .....
मोबाईल मध्ये नवीन अॕप लोड करताना फोटो गॕलरी वगैरे अनेक प्रकारच्या परवानग्या आपण फारसा विचार न करता देत असतो ......
*आपल्या मुख्य खात्याला जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल ते खाते मोबाईल बँकिंग किंवा upi वगैरे दैनंदिन गोष्टींना वापरु नये असे मला वाटते* .
*त्याच्या साठी एखादे सेकंडरी अकाउंट उघडावे आणि दुसरा फोन नंबर त्याला लिंक करावा व त्याच्या मध्ये काही हजारांपेक्षा जास्त बॕलन्स ठेवू नये हे माझे वैयक्तिक मत आहे* .....
सध्या लाॕकडाऊन मध्ये अनेक तज्ञ मंडळी आर्थिक घोटाळे करत आहेत अशावेळी आपले कष्टाचे पैसे आपणच सुरक्षितरीत्या वापरावेत अशी इच्छा ....
कॕशबॕक वगैरे विनोदी गोष्टींसाठी विवेकबुध्दी गहाण टाकू नये म्हणून हा प्रयत्न
विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा