//श्री स्वामी समर्थ//
*आनंदयात्री*
*सौ.उज्वला पाटील वाईकर*
25/08/2020
*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
डहाणूकर काॕलनीत राहणाऱ्या आणि टेलिफोन खात्यात आॕफीसर असलेल्या पाटील साहेबांची ही मुलगी . लांब केस आणि सुरेख व्यक्तीमत्व असलेली ,अभ्यासपूर्ण स्पष्ट मत मांडणारी , विनोदाची उत्तम जाण असलेली , MIT काॕलेज मध्ये शिकलेली , उत्तम दर्जाचे साॕफ्टवेयर लिहिणारी ......
पी .जे. इलेक्ट्रॉनिक्स कंपनीतील संशोधन आणि विकास विभागातील महत्वाची जबाबदारी लीलया पार पाडणारी ,कंपनीतील त्या वेळी काम करणाऱ्या सर्व मुलींना योग्य सल्ला देणारी असे बहूआयामी आणि आनंदी व्यक्तिमत्त्व म्हणजे उज्वला पाटील .
मायक्रोप्रोसेसर तंत्रज्ञानाचा तिचा अत्यंत सखोल अभ्यास होता . Assembly language चा सुयोग्य वापर करून कंट्रोलर आणि प्रिंटर यांच्या मध्ये उच्च दर्जाचे प्रोग्रॕमिंग स्किल्स वापरून साधलेला संवाद अद्वितीय होता .
या बद्दल डाॕ.मराठे यांनी अत्यंत कौतुकाने दिलेली शाबासकी बरेच दिवस आमच्या लक्षात राहिली.CBC किंवा क्लच , ब्रेक असेंब्लीच्या बद्दल प्रिंटरवर येणारा डेटा अभ्यासून , फिलिप्स कंपनीला अनेक मेकॕनिकल सुधारणा करणे सहज शक्य झाले होते.
प्रोग्रॕमिंग मधील शास्त्रीय गायन म्हणजे Assembly language याचे अनेक उच्च दर्जाचे आलाप घेणारी ही अत्यंत आनंदी आणि समाधानी मुलगी सुयोग्य वेळी शनिवारात राहणाऱ्या वाईकरांच्या जीवनात आणि पाॕवर इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रात सहजपणे सामावून गेली...
आज वाढदिवसा निमित्ताने उज्वलाजींना मनःपूर्वक शुभेच्छा ....
💐💐🎂🎂💐💐
*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द ,
पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा