सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

आनंददायी अमावस्या

 // श्री स्वामी समर्थ // 


 *आनंददायी अमावस्या*


*विनायक जोशी (vP)*

💬9423005702

📱9834660237


माझ्या लहानपणी "अमावस्या" ही तिथी किंवा हा दिवस आनंददायी करायचे पूर्ण श्रेय वडवळच्या नागनाथ महाराजांना आहे. सोलापूर पासून साधारणपणे  ३०-३२ किलोमीटर अंतरावर असलेले हे देवस्थान .


 देवळाला पारंपारिक पध्दतीने बांधलेले दगडी कंपाउंड आणि आतल्या बाजूला  गाभाऱ्यात अत्यंत तेजस्वी अशा स्वयंभू अवतारातील नागनाथ महाराजांचे अस्तित्व .


 देवळाच्या बाहेर टोपल्यांमध्ये जिवंत नाग घेऊन बसलेली असंख्य मंडळी उपस्थिती लावायची . अमावस्येला नागनाथ महाराजांची यात्रा असल्यामुळे पूर्ण वडवळ गावात उत्साहाचे वातावरण असे.


आईच्या बरोबरीने अनेक वेळेला आम्ही  वडवळला गेलो आहोत . सोलापूर रोड वरती वडवळ फाट्याला उतरुन पायवाटेने शेतांच्या मधून या देवळात जाताना छान वाटत असे.


नागनाथ महाराजांच्या या यात्रेमुळे अमावस्या हा दिवस रहस्यमय किंवा निराशेचा न जाता आनंदाने पार पडत असे.


माझ्या वैयक्तिक आयुष्यात सुध्दा अनेक चांगली कामे अमावस्येला पार पडली आहेत. अनेकदा प्रवास सुध्दा या दिवशी सुखकर झाला आहे.


 श्रध्दा आणि आनंद या गोष्टींची  कधीही चिकित्सा न केल्यामुळे कोणतीही तिथी असली तरी आपला दिवस म्हणजे एकदम प्रसन्न  ..... !

🙏🙏🙏


----------------------------


 ( आज सर्वपित्री अमावस्या आहे . या निमित्ताने आपल्या  पूर्वजांचे आठवणीने आणि शांतपणे स्मरण करायचा हा दिवस आहे . 


आपल्या पूर्वजांची मृत्यूतिथी माहिती  नसली तरी आजच्या दिवशी म्हणजे सर्वपित्री अमावस्येला अत्यंत श्रध्देने करायचे कर्म किंवा श्राध्दकर्म करावे असा हा दिवस  .....

🙏🙏🙏)


*विनायक जोशी ( vp )*

 💬9423005702

📱9834660237


१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१.

*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा