// श्री स्वामी समर्थ //
ऋणानुबंध
*मिलिंद भावे*
25/09/2020
बरोबर ३७ वर्षांपूर्वी म्हणजे साधारणपणे १९८३ साली मिलिंद भावे या अत्यंत हरहून्नरी माणसाची पहिली भेट झाली . थोड्याच दिवसात त्याच्या आई बाबांची ओळख झाली आणि त्याचे बाबा किंवा हरीभाऊ भावे नावाचा अत्यंत आनंदी मित्र मला मिळाला ....
मिलिंदला तीन बहिणी . या तिघींची छान ओळख झाली . कालांतराने त्यांची लग्ने झाली आणि त्यामुळे गोरे , भागवत , पाटील यांच्या घरात माझा आनंददायी प्रवेश झाला .....
भावेंच्या आयुष्यात भाचरांचा प्रवेश झाला आणि त्यांच्या बरोबरच मला कायम आनंददायी गोंधळ घालणारा विनायक मामा असा हूद्दा प्राप्त झाला आणि अर्थातच भरपूर प्रेम मिळाले ....
मिलिंदचे लग्न झाले . काणे कुटुंबांशी ऋणानुबंध जुळून आले . मन्या किंवा वेदांगचा जन्म झाला आणि गंपती काका या नात्याची सुरुवात झाली ......
काळानुरुप मिलिंदची भाच्चे कंपनी मोठ्ठी झाली . त्यांची लग्ने झाली आणि भिडे , गोडबोले , दामले , गद्रे असा परिवार वाढला .....
भाच्चे कंपनीला मुले झाल्यावर मात्र मामा आजोबा झालो 😜😀
आता आमच्यासाठी "मिलिंद भावे" म्हणजे ऋणानुबंधानी कायम स्वरुपी जोडलेला पूर्ण परीवार आहे .
भावे , गोरे , भागवत , पाटील , काणे , फडके , भिडे , गोडबोले , दामले , गद्रे .....असा कमालीचा आनंदी आणि कायम सर्वांच्या हिताचे चिंतणारा अत्यंत समाधानी परिवार .....
आमचे लग्न झाल्यावर कल्याणीला कमालीच्या सहजतेने त्यांनी सामावून घेतले आणि भरभरून प्रेम दिले .....
कायम उत्साही असणाऱ्या आणि चिरतरुण दिसणाऱ्या मिलिंद हरिभाऊ भावे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
💐💐🎂🎂💐💐
*विनायक आणि कल्याणी (vP)*
💬9423005702
📱9834660237
1257 , Mangaldham , B3 , Vitthalwadi , Hingenekhurd , Pune 51
electronchikatha.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा