// श्री स्वामी समर्थ //
*संवेदनशील तत्वनिष्ठ*
*विजय पद्माकर बढे*
17/10/2020
*MD* Inditech
*Director* Eltech
*विनायक जोशी (vP)*
📱9423005702
कोणतीही गोष्ट मनापासून करणारा आणि त्याच्यासाठी वाट्टेल तेवढी मेहनत घ्यायची तयारी असणारा.कामाशिवाय इतर क्षेत्रात सुध्दा रसरशीतपणे भाग घेणारा असा विजय बढे.
पोस्ट ग्रॕज्यूएशन करत असताना लाभलेले विजय भटकरां सारखे गुरु असोत किंवा पी.जे.इलेक्ट्रॉनिक्स मधील डाॕ.मराठेंसारखे गुरू किंवा गाणे शिकवणाऱ्या पुणतांबेकर मॕडम अथवा मॕरेथाॕन रनींगचे धडे ज्यांच्या कडे गिरवत आहे ते JJS ग्रुपचे प्रमोद देशपांडे सर यांचा तो विशेष अनुग्रह लाभलेला शिष्य आहे . CEF या संस्थेच्या डाॕ.मनिष गुप्ता सरांमुळे व्यावसायिक आयुष्याकडे बघायची सम्यक दृष्टी त्याला प्राप्त झाली आहे .
ब्राह्म मुहुर्तावर साॕफ्टवेयर मधील अल्गोरिदमस् लिहिणे , पहाटेच्या वेळी २१ किलोमीटर रनिंगसाठी लागणारी तयारी करणे , पूर्ण दिवस इंडिटेक आणि एलटेक या दोन्ही कंपन्यात महत्वपूर्ण काम करणे , संध्याकाळी बॕडमिंटन खेळणे , रात्रीच्या प्रहरात गाण्याचा रियाज करणे , संधी मिळेल तेथे मनापासून आपली कला सादर करणे ( बदला घेणे 😜)वगैरे गोष्टी तो सहजपणे करत आहे .
प्रोफेसरांचा मुलगा , कायम जिद्दीने साथ देणाऱ्या स्वातीचा जोडीदार , निरंजन आणि वल्लभ या दोन्ही मुलांचा जवळचा मित्र , याचबरोबर संपर्कात आलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळींचा जगन्मित्र असलेला , परमार्थात अधिकारी असलेल्या नाईक आज्जींचा हा शिष्य , आई वडिलांच्या कृपाशिर्वादाने उत्तम मार्गक्रमण करत आहे . परवाच्या गणपती उत्सवात त्याने *या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे* या गाण्यातून आयुष्याकडे तो कसा बघतो आहे हे सांगितले आहे
कर्वेनगर येथील अनुपम हाईटस मध्ये राहणाऱ्या आणि कामासाठी भरपूर प्रवास करणाऱ्या या अत्यंत हुशार आणि शांत व्यक्तिमत्वाला आमच्या कडून वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा
💐🍥🎂💐
*विनायक आणि कल्याणी (vP)*
📱9423005702
मंगलधाम , हिंगणेखुर्द लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा