रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

तीन दिवसांचा पाव्हणा "ताप"

 // श्री स्वामी समर्थ //

   

 तीन दिवसांचा पाव्हणा


      *ताप*


विनायक जोशी

💬9423005702 


१६ आॕक्टोंबर म्हणजे घटस्थापनेच्या आदल्या दिवशी अंगात कणकण आहे असे वाटले ...


साधारणपणे दहा वर्षांनी येत असलेल्या  तापाला अजिबात  विरोध केला नाही . १७ आॕक्टोंबर या घटस्थापनेच्या दिवशी थोडासा ताप आला .


निखिल कडून डिजीटल थर्मामिटर विकत आणला . ताप ९९ एवढा होता .


सहजपणे पल्स आॕक्सी वरती आॕक्सिजन चेक केले . आॕक्सिजन ९७ आणि पल्स रेट १०५ होते .


दूपारी बारा पर्यंत पल्स रेट १२७ ला गेला . छातीत धडधड होत होती परंतु कोणताही त्रास होत नव्हता ...


संध्याकाळी विनायक फाटक यांना फोन केला . त्यांनी अॕटी अॕलर्जीची एक गोळी लिव्होसेल M आणि तापासाठी साधी कॕलपाॕल 325 दिवसातून ३ वेळा घ्यायला सांगितले .


अॕटी अॕलर्जी गोळी घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी पल्सरेट ८५ पर्यंत खाली आला ....


अशक्तपणा जाणवत होता . जेवायाला नको वगैरे वाटत होते . ताप मात्र ९९ वरती स्थिरावला होता . 


तिसऱ्या दिवशी सकाळी कडक चहा प्यायल्यावर अचानक घाम आला आणि तापमान ९७ दाखवले ...


संसर्गजन्य असल्यामुळे कल्याणीला ताप आला . तिला सुध्दा हीच वैशिष्ट्ये होती . तिला अॕटी अॕलर्जी लागली नाही . अशक्तपणा किंवा सतत उलटी होण्याची भावना होती ..


नवरात्र असल्यामुळे सोवळ्यातील पूजा आणि कल्याणीचे महालक्ष्मी अष्टक १५ वेळा किंवा रामरक्षा ९ वेळा वगैरे संकल्प असल्यामुळे विश्रांती हा कार्यक्रम रात्री ठेवला . रात्री १० ते सकाळी ७ असे ताणून देत होतो.


कल्याणीचा ताप गेल्यावर आम्हाला लक्षात आला की आम्हाला वास येणे पूर्णपणे बंद झाले आहे 😀😀. अनेक उग्र वास हूंगून बघितले 


या नंतर सुध्दा खायची इच्छा होत नव्हती म्हणून स्पोर्डेक्स या गोळ्या घेतल्या आणि बरोबर दहा दिवसांनी  ठणठणीत बरे होवून तळजाई सुरुवात केली .


थोडक्यात ताप आला तर विश्रांती घेणे , दैनंदिन काम करणे , कमितकमी इतर लोकांच्या संपर्कात येणे हे पथ्य पाळले ..


आमच्या आसपास सिनियर सिटीझन असल्यामुळे छान पैकी स्वतःच्या घरात दार खिडक्या उघड्या ठेवून राहीलो .


ताप बरा होण्यासाठी घरातील हवा मात्र खेळती पाहिजे .


या वेळी नवरात्र व्यवस्थित पार पडावे म्हणून कुलदेवता योगेश्वरी ,गजानन महाराज , स्वामी समर्थ  यांच्या बरोबर शंकर महाराजांचे स्मरण केले .


बरोबर चौथ्या दिवशी विनायक फाटकांना माझ्या  खालील गोष्टी कळवल्या


१९ आॕक्टोंबर २०२०

सकाळी ९.५०


पल्स रेट ६५

आॕक्सिजन ९८

शरीराचे तापमान ९५.५


 औषधे


कॕलपाॕल ३२५ मिली --३ वेळेला


लिव्होसेट M --१ रात्री 


बी.पी.नेहमीची गोळी

लोसार २५ -१ सकाळी


*All Is Well*

🚶🏻‍♂️🚶🏻‍♀️


विनायक जोशी

💬9423005702

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा