*@ तळजाई*
बारीकसारीक पावसात छानपैकी दहाहजार पावलांची वारी करुन आलो . बऱ्याच ठिकाणी खांद्या पर्यंत गवत आणि फक्त पावसाळ्यात प्रगट होणारी अनेक झाडे शांतपणे बघता आली . चिखलाची पायवाट असल्यामुळे सांभाळून सावकाश चक्कर मारुन आलो . साधारणपणे पन्नास ते सत्तरफूट उंचीची अनेक जूनीजाणती झाडे आनंदात उभी आहेत . मोर आहेत , मुंगुस आहेत , ससे आहेत , खारी आहेत . आपल्याच नादात जाणाऱ्या धामणी आहेत . ध्यानाचे दगड आहेत . सत्तावीस किलोमीटर अंतरावर ढगांची शाळा भरलेल्या अवस्थेतील सिंहगड दृष्टीपथात आहे . दोन सुंदर कॕनाॕल आहेत . हजार चिमण्या मुक्कामाला असलेली झाडे आहेत . येथे काहिही साध्य करायला जायचे नाही . हे फक्त परफेक्ट साथीदारा बरोबर अनुभवायचे जग आहे ..
*विनायक जोशी (vP)*
💬9423005702
📱9834660237
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा