सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

द्वारकाधीश

 // श्री स्वामी समर्थ //

    

 *द्वारकाधिश*

      🙏🙏🙏


विनायक जोशी(vp)

💬9423005702

 📱9834660237 


 स्वातंत्र्य पूर्व काळात जेल मधील कैद्यांना मानसिक दृष्ट्या बळकट ठेवण्यासाठी विनोबा भावे गीता सोप्या भाषेत सांगत असत. गीता ऐकताना बऱ्याचशा कैद्यांना ही गीता इंग्रजांनी सुद्धा ऐकावी असे वाटत असे .परंतु विनोबांना कल्पना होती कि इंग्रजांचा कर्मयोगाचा सराव कित्येक शतके आधीच चालू झाला होता. 


ऐका सर्वश्रेष्ठ धनुर्धराला मानसीक दृष्ट्या कणखर बनवून युद्धासाठी तयार करण्यासाठी कृष्णाने केलेला संवाद म्हणजे गीता.महाभारता मधील या महान सूत्रधाराचे व्दारकेत जाऊन दर्शन घेणे हा अलौकिक योग आहे. 


गुजरात मध्ये गोध्रा दंगलीच्या काळात आई आणि दादांना घेऊन नारायण  सोमनाथ , द्वारका वगैरे तीन दिवसांच्या दौऱ्यावर गेला होता.


 आयुष्यातील बराच काळ गीता धर्म मंडळाचे काम हिरीरीने करणारे दादा आणि त्यांच्या मागे खंबीर पणे उभा असलेला

योगेश्वर कृष्ण या मुळे दर्शन मनाजोगते झाले.


 द्वारकेत पोचले त्या वेळी देवांच्या नैवेद्याची वेळ असल्यामुळे देवा समोरचा पडदा लावलेला होता. साधारणपणे २० मिनिटांनी अतिशय तेजस्वी आणि प्रसन्न अशा देवांचे दर्शन झाले. या प्रसंगी दादांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंची धार लागलेली होती . 

गेली कित्येक वर्षे पहाटेच्या वेळी केलेली मानसपूजा फळाला आली होती.

 आई - वडिलांचे पाय उन्हात भाजू नयेत म्हणून हातात त्यांच्या चपला घेऊन पळणारा नारायण आणि कृष्णाला बघून भाव समाधी लागलेले वडिल आपापले कर्म अत्यंत समाधानकारक पणाने पार पाडत होते !

🙏🙏🙏


  *विनायक जोशी (vp)*

💬9423005702

📱9834660237 

१२५७ , मंगलधाम , बी३, विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द ,लेन नंबर ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा