// श्री स्वामी समर्थ //
*आनंदयात्री*
विनायक प्रभाकर जोशी
*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
माझ्याकडे आनंदी स्वभाव नावाचे एक साधे सोप्पे साधन होते . त्याच्या मदतीने मी सहजतेने छान काम करायला सुरूवात केली . आपल्या सहवासात येणारी माणसे किंवा आपण वापरत असलेल्या वस्तू किंवा वास्तू यांच्या बरोबर प्रेमाने काम करणे एवढे एकच व्रत पाळले .
एका वेगळ्या अनुभवाच्या जगात प्रवेश केला . कोणत्याही गोष्टींची अथवा माणसांची भिती सहजपणे संपुष्टात आली .कोणालाही फाॕलो करावे किंवा कोणीही आपला आदर्श ठेवावा असे वाटले नाही .
दररोज उत्साहाने आणि आनंदाने काम सुरू करणे आणि काम उत्तम पणे पूर्ण करणे एवढाच दिनक्रम ठेवला . चांगल्या किंवा आनंददायी गोष्टींच्या लाटा मनापासून अनुभवल्या . व्यावहारिक मोजमापाच्या पट्यांच्या जवळ जायचा मोह टाळला .
स्वतःला स्वतःचा कंटाळा येईल असा वागलो नाही . आपले स्वतःला आवडणारे काम थांबल्या नंतर सहजपणे १०० दिवस आपण आपल्या घरात आनंदाने राहू शकतो याचा अनुभव घेतला .
स्वतःवरती प्रेम आणि स्वतःवरती विश्वास या मूलभूत गोष्टी आपोआप जोपासल्या गेल्या .
कोणत्याही संकल्पनेच्या दोन ओळींमधील दडलेला अर्थ सहजपणे वाचायला यायला लागला की मिळणारी आनंदाची अनुभूती अनुभवली .खूप वर्षे आनंदाने काम केल्यामुळे छान अशा समाधानाच्या अनेक पायवाटा तयार झाल्या आहेत . या नंतर मात्र आनंदयात्री बनण्यासाठीचा महामार्ग स्वच्छ आणि स्पष्टपणे दिसायला लागला .
एकदा या रस्त्यावरचा प्रवास सुरू झाला म्हणजे त्या नंतर मात्र तुम्हाला कोणाही कडून काहिही नको असते.
फक्त आनंदाचे डोही आनंद तरंग अनुभवायचे आपल्या छोट्याशा मंगलमय आणि समृद्ध अशा घरट्यात शांतपणे कल्याणी बरोबर ....
*विनायक जोशी(vp)*
💬9423005702
📱9834660237
१२५७ , मंगलधाम ,बी ३ , विठ्ठलवाडी ,हिंगणे खुर्द ,लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा