// श्री स्वामी समर्थ //
*Young India*
*आनंदयात्री*
*अश्विनी प्रफुल्ल चिटणीस*
Tech Mahindra
*11/10/2020*
विनायक जोशी (vP)
💬9423005702
📱9834660237
पुण्यातील सिंहगडरोडची सुरुवात ही अत्यंत जबरदस्त अशा रामकृष्ण मठाने होते . तेथून बरोबर ४ किलोमीटर अंतरावर विठ्ठल रखुमाईंच्या कृपाशिर्वादात हिंगणेखुर्द हे अतिशय सुंदर गाव आहे . या गावातील लेन नं ४ मधील कमालीची पाॕझिटीव्ह व्हायब्रेशन्स असलेल्या *१२५७ मंगलधाम* या वास्तूत २००६ च्या वसंतऋतू मध्ये *अश्विनी* रहायला आली आणि प्रगतीच्या दिशेने प्रवास चालू झाला .....
अत्यंत सुरेख अशा अभिनव शाळेत मातृभाषेचा सार्थ अभिमान बाळगत शिक्षण पूर्ण केले . SP काॕलेज मधून BSC सहजतेने पूर्ण केले . माॕडर्न काॕलेज मधून MSC करत असतानाच तीला नोकरी मिळाली ....
*वेबवर्क्स* या कंपनीत कामाची सुरुवात केली आणि त्या नंतर
*DB Xento*
*Capgemini*
*Tech Mahindra*
असा अनुभव समृद्ध करणारा आनंददायी कामांचा प्रवास चालू आहे .
भरपूर चालणे , प्राणायाम करणे आणि कम्यूनिकेशन स्किल्स वाढावी म्हणून थोडावेळ नेटफ्लिक्स वरील उत्तम गोष्टी बघणे हा तिचा नित्यक्रम आहे .....
अत्यंत कडक आणि तत्वनिष्ठ अशा त्र्यंबक चिटणीस या आजोबांची ती नात आहे , आज्जीचा प्रेमळपणा तिच्याकडे आला आहे , प्रफुल्ल चिटणीस या बाबांच्या कडून कोणतेही काम चिकाटीने करणे हे ती शिकली आहे , आई ही तीची बेस्ट फ्रेंड आहे , कारखानदार असलेला विजयकाका तिचा आदर्श आहे ......
*अश्विनी चिटणीस* ही मराठमोळी आणि आनंदी स्वभावाची सरळ मुलगी अत्यंत साधेपणाने गेली आठ वर्षे *IT* क्षेत्रात कठोर मेहनत घेऊन उत्तम काम करत आहे .
नैतिकता पाळून आणि संघर्षमय वाटचाल करुन ज्यावेळी यश मिळते त्याचवेळी आपण *आनंदयात्री* होऊ शकतो याची पूर्ण कल्पना असलेल्या *अश्विनी ज्योस्ना पफुल्ल चिटणीस* या मुलीला आज वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा ....
*विनायक आणि कल्याणी जोशी*(vP)
💬9423005702
📱9834660237
१२५७ , मंगलधाम , बी -३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा