रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

चक्रपाणी काका गुरुजी

 // श्री स्वामी समर्थ //


  *गणिताचे गुरुजी*


  विनायक जोशी (vP)

  💬9423005702

  📱9834660237 


अत्यंत हुशार आणि उमदे व्यक्तिमत्त्व. तरुण वयातच अनपेक्षित अशा आजारपणामुळे कायमचे शारीरिक  परावलंबीत्व आले . या नंतर त्यांनी घरातच काॕलनी मधील मुलांना गणित हा विषय शिकवायचे ठरविले .


 अनामिका आणि शेजारच्या बोटा मध्ये मागील बाजूने पाटीवरील पेन्सिल धरायची आणि गणिते सोडवायची अशा पध्दतीने ते लिहित असत. काकांच्या समोर बसलेल्या पाच सहा विद्यार्थ्यांनी त्या प्रमाणे स्वतःच्या वहीत गणिते सोडवायची . कोणत्याही प्रकारचे संभाषण नसलेल्या या निशब्द क्लास मध्ये फक्त काकांच्या पाटीवर चालणाऱ्या पेन्सिलचाच आवाज यायचा . 

काका प्रत्येक गणित स्वतः सोडवत असत आणि आम्ही विद्यार्थी अत्यंत एकाग्रता पूर्वक त्यांची गणिते सोडवण्याची पध्दत आचरणात आणत असू. गणित या विषयाची गोडी लागण्याची किंवा अजिबात भिती न वाटण्याचे श्रेय पूर्णपणे चक्रपाणी काका या आमच्या काॕलनीतील गणितांच्या गुरुंनाच आहे . 


गुरू आणि शिष्य यांच्यात संवाद साधण्यासाठी शब्दांची अजिबात जरूरी पडत नाही याचा पहिला वस्तूनिष्ठ धडा दहावीत असतानाच मिळाला...

🙏🙏🙏


 *विनायक जोशी (vp)*

 💬9423005702

  📱9834660237 

 मंगलधाम , हिंगणेखुर्द ,लेन नं ४, पुणे ५१

electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा