सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

नेने काका माणिकबाग

 // श्री स्वामी समर्थ //


      *नेने काका*


साधारणपणे दहा बारा वर्षांपूर्वी सकाळच्या फिरणे या कार्यक्रमाच्या वेळी विठ्ठलवाडी बसस्टाॕप येथे आनंदात बसलेल्या काका काकूंची पहिली भेट झाली ......


पहिल्याच भेटीत वेव्हलेंग्थ जमून आली . औपचारिकपणा हा प्रकार फारसा रेंगाळला नाही . जे बोलायचे ते स्पष्ट , आनंदी , मनमोकळेपणे , रोकठोक त्यामुळे छान वाटायचे .....


रस्त्यावरील गर्दीमुळे आम्ही तळजाईला फिरायला जाऊ लागलो आणि भेटीगाठी कमी झाल्या .......


असेच एकदा हिंगण्याच्या मागील बाजूस झालेल्या नवीन ट्रॕक वरती त्यांची भेट झाली आणि मागचा गप्पांचा बॕकलाॕग भरुन काढला .......


आमच्या घरी आल्यानंतर कल्याणीच्या क्लासची जागा वगैरे गोष्टी कमालीच्या आस्थेने आणि प्रेमळपणाने त्यांनी बघितल्या होत्या .


एकदा अचानक त्यांच्या माणिकबागेतील घराला भेट द्यायचा योग आला . एकदम व्यवस्थित आणि सुटसुटीत अशा त्या घरातील कोपरान कोपरा आनंदी वास्तू या प्रकाराची जाणीव करुन देत होता ....


माणिकबागेतील गणेशोत्सवातील दणदणाटा पासून ते अमेरिके पर्यंत अनेक विषयावर सहज गप्पा मारणारे , त्यावेळी वाट्याला येणारा वैताग घालवायसाठी विनोदी शब्दांचा अचूक वापर करणारे , कमालीचा पाॕझिटीव्ह दृष्टिकोन असलेले अशा नेने काकांची छोटीशी  आठवण ......


विनायक जोशी

💬9423005702 

📱9834660237

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा