// श्री स्वामी समर्थ //
*मंत्र जागर*
. 23/08/2020
*विनायक जोशी (vp)*
💬9423005702
📱9834660237
गौरी आणि गणपती या दोघांच्या आगमनाने घरात अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण तयार होते .
साधारणपणे चार वर्षांपूर्वी
सारसबागेच्या किंवा तळ्यातल्या गणपतीच्या उजव्या बाजूला असलेल्या कांचीच्या शंकराचार्यांच्या मठातून नारायणचा मंत्र जागर करायचा का असा फोन आला .
"ऋग्वेदा" मधील साधारणपणे साडेदहाहजार मंत्र किंवा लाखभर पदे मुखोदगत असलेले "घनपाठी" ब्राह्मण हे मंत्र म्हणायला येणार होते.
पहाटे पासून अत्यंत उत्साहाने आणि आनंदाने तयारी सुरु केली.कमालीची पाॕझीटीव्ह शक्ती असलेला नारायण आणि त्या नंतर थोड्याच वेळात ब्रह्मवृंद दाखल झाला.
आमच्या घराच्या दरवाजावर Tuition असा फलक असल्यामुळे सुरवात "सरस्वती " च्या मंत्रांपासून झाली. त्या नंतर चाळीस मिनीटे वेगवेगळ्या प्रकारच्या मंत्रांचा आविष्कार बघायला आणि ऐकायला मिळाला.
या नंतर सर्वांची ओळख आणि त्या नंतर प्रमुख गुरुजींनी वेदशास्त्रां बद्दल माहिती सांगितली . या घनपाठी गुरुजींच्या मधील जे गेली अनेक वर्षे हेच मंत्र म्हणत आहेत अशी मंडळी मात्र थोर शास्त्रीय गायकां सारखे उत्तम रीतीने मंत्रांचे सादरीकरण करत होते.
गुरुकुल पध्दतीने राहून पंधरा सोळा वर्षे अध्ययन करुन त्या नंतर परीक्षेत पास होणारे हे " घनपाठी " गुरुजी वेगळेच वाटले.
आपण ज्या वास्तू मधे राहतो ती वास्तू कायम आपल्याला *तथास्तु* असा आशिर्वाद देत असते याची पूर्ण जाणीव ठेवून आम्ही सर्वांनी म्हणजेच अत्यंत आनंदी असे अनेक स्नेही , मी , नारायण आणि कल्याणी यांनी या " ऋग्वेदातील मंत्रांच्या " मधून निघणाऱ्या स्पंदनांचा अनुभव घेतला .
गणपतीच्या काळात मंत्र जागर झाल्यामुळे सोलापूरच्या गणपतीच्या आठवणी जागृत झाल्या.आचार्य फडके गुरुजी आणि त्यांचे दहा सहकारी यांच्या मंत्र जागराची आठवण आली....
*विनायक जोशी ( vp )*
💬9423005702
📱9834660237
१२५७ ,मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नं ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा