सोमवार, २३ नोव्हेंबर, २०२०

दक्षिणद्वार @ नृसिंहवाडी

 // श्री स्वामी समर्थ //     

     *नरसोबाची वाडी*

         *दक्षिणद्वार*


*विनायक जोशी (vp)*

📱9423005702


   पश्चिम महाराष्ट्रातील अतिशय सधन आणि निसर्ग संपन्न अशा भागात सांगली - मिरजे पासून २०-२२ किलोमीटर अंतरावर नृसिंहवाडी नावाचे नितांत सुंदर गाव आहे.या ठिकाणी  श्री नृसिंह सरस्वती यांनी तपश्चर्या केली होती.आसपासच्या गावात भिक्षा मागून ते रहात असत.इथे अतिशय सुंदर असे मंदिर आहे.तेथे दत्त महाराजांच्या जागृत अशा पादुका आहेत.मंदिरामधे पहाटेच्या काकड आरती पासून रात्रीच्या शेजारती पर्यंत सर्व कार्यक्रम वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामींनी ठरवून दिलेल्या पद्धतीने पार पडत आहेत.या पूर्ण गावावरती दत्त महाराजांचा समाधानकारक आशिर्वाद आहे.देवळाच्या परिसरात ओवऱ्या आहेत. तेथे बसून गुरुचरित्राचे पारायण करता येते .कृष्णा आणि पंचगंगेचा संगम जवळ असल्यामुळे पावसाळ्यात नदीचे पाणी पादुकां वरुन वाहते आणि दक्षिणेकडून बाहेर पडते यालाच *दक्षिणद्वार* असे म्हणतात .या पादुकांवरुन येणाऱ्या पाण्यात स्नान करण्यासाठी असंख्य भाविक येथे जमतात.पाऊस जास्त झाला तर मात्र येथील सर्व परिसर जलमय होतो आणि त्याला एखाद्या बेटाचे स्वरुप येते. पूर सदृश परिस्थितीत उत्सव मुर्ती मात्र गावातील मानाच्या पुजाऱ्यांचा घरी हलवली जाते.या ठिकाणी अत्यंत कडक अशा सोवळ्यामधे पूजाअर्चा चालू असते.दुपारच्या वेळी होणारी महापूजा आणि रात्रीची पालखी बघणे हा फार आनंददायी असा अनुभव आहे.माघ महिन्यात या ठिकाणी कृष्णावेणीच्या उत्सवात वेगवेगळे नामवंत कलाकार दत्त महाराजांच्या समोर अत्यंत श्रद्धा पूर्वक आपली सेवा रुजू करतात. "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा" या जपाने पावन झालेल्या या भूमीत तुम्ही अवश्य जाऊन यावे !


*विनायक जोशी (vp)*

 📱9423005702

मंगलधाम , हिंगणेखुर्द  लेन नंबर ४ , पुणे ५१ *electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा