// श्री स्वामी समर्थ //
*मैत्र जीवाचे*
2 August 2020
*विनायक जोशी(vp)*
💬9423005702
📱9834660237
"कर्माचा सिद्धांत " या पुस्तकात मागील जन्मातील "कर्मांच्या " बद्दल विस्तृत माहिती आहे. मला स्वतःला मात्र माझ्या आयुष्यात आलेल्या अनेक मित्रमैत्रिणींचा आणि माझा मागच्या जन्मातील राहिलेला सहवास होता असे कायम वाटते.
सहवास ही स्नेहाची पहिली पायरी असली तरी कायम आपले चांगले व्हावे म्हणून झटणारी , सर्व मर्यादा ओलांडून वाहून घेणारी, निरपेक्षपणे वाटेल ते काम करणारी बरीच जिवलग मंडळी माझ्या आयुष्यात आहेत.
असंख्य मित्रांच्या बरोबरीने आयुष्यभर पुरतील अशा आनंददायी आठवणीं मुळे समृद्ध आणि समाधानी आयुष्य जगता येत आहे.अतिशय आवडणारे क्षेत्र आणि उत्तम सहकारी यांच्या बरोबरीने काम करायला मिळाल्या मुळे वेगवेगळ्या प्रकारचे आनंददायी अनुभव मनात कोरले गेले आहेत.
अत्यंत एकाग्रपणे स्वतःला आवडणारे काम वेगळेपणाने आणि वेगाने करणाऱ्या किंवा ज्यांचे काम बघणे हा सुध्दा आनंददायी अनुभव वाटायचा अशा अनेक कलंदर मित्रांचा मनस्वीपणा अनुभवता आला ! या सर्वांनी हातचे काहिही राखून न ठेवता बरेच बारकावे मला शिकविले .त्या सर्व अव्यवहारी वेडेपणा करणाऱ्या मित्रांची आज आलेली ही आठवण आहे.
"अमृततुल्य चहा"नावाच्या स्वर्गीय टपरीवर "कटिंगचहा" मित्रांच्या बरोबर घेणे हा न संपणारा अलौकिक योग मी असंख्य वेळेला अनुभवला आहे.
बेफिकीर आणि मनसोक्त अशा प्रकारे जगलेल्या असंख्य मजेदार आणि आनंददायी आठवणींचा तुफान असा पाऊस कोसळायला लागतो आणि श्रावणमासी हर्ष मानसी या ओळी हात धरून नाचायला लागतात.
साधारणपणे आमच्याकडे क्लासला येणाऱ्या पाचवीच्या गँग पासून ते नव्वदी सहजपणे पार केलेल्या दिलदार देशमुखां पर्यंत असा मोठ्ठा मित्र परीवार छान आनंदाने कार्यरत आहे .
*मैत्र*" या कॕटेगरी मध्ये असलेल्या असंख्य मंडळीं मध्ये आणि माझ्यात असलेला एकमेव घट्ट दुवा म्हणजे *अत्यंत मनस्वीपणा फक्त* ! !
*विनायक जोशी ( vp )*
💬9423005702
📱9834660237
१२५७ , मंगलधाम , बी ३, विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१
*electronchikatha.blogspot.com*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा