रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

आमची खिडकी ...स्वप्निल तावडे

 *जय गजानन*


*खिडकी*

      *स्वप्निल तावडे*

📱9822253810

    

 ३१ जूलै २०२०

  

देणाऱ्याने देत जावे

घेणाऱ्याने घेत जावे 

घेणाऱ्याने घेता घेता 

देणाऱ्याचे हात बनावे

या ओळींना समर्पक अशी एक खिडकी मज नशीबवान माणसाकडे आहे. 


या खिडकी पलीकडील दाम्पत्याने  निस्वार्थी भावनेने फक्त आणि फक्त दिलेच आहे. तेही उजव्या हाताने दिले तर डाव्या हाताला पत्ता न लागता.


सकाळी सकाळी या खिडकीतून उत्तम संस्कृतमधील श्लोक, सुभाषिते विद्यार्थ्यांच्या तोंडून ऐकू येतात. एक उत्तम गुरु आपल्या सर्व शिष्यांना एक समान वागणूक देऊन ज्ञानदानाचे पवित्र कार्य खिडकीतूनच बघायला मिळते. प्रातःकाळी मन प्रसन्न होऊन दिवसाच्या सर्व कार्यांना तयार होते. 

मग कधी या खिडकीतून अगदी आपुलकी, आस्था  असलेली आणि अकृत्रिम भावनेने चौकशी होते तर कधी वडीलकीच्या नात्याने दिलेले सल्ले अगदी मुक्तहस्ते मिळतात.


 कधी अध्यात्मिक पुस्तके आणि त्याच सरळ सोप्या अध्यात्माने केलेल्या पूजेचा प्रसाद तृप्त भावनेने दिला जातो. ही खिडकी जणू वैचारिक  व्यासपीठाचे प्रवेशद्वारच आहे. कुठलीही अडचण मांडा समोरून सकारात्मक उत्तरच मिळेल. बहुदा नव्हे नव्हे निश्चितच ही दातृत्वाची वृत्ती अनुवंशिकच आहे.


अशा खिडकीचा शेजार आम्हास लाभला आहे ही आमच्यावर सद्गुरू कृपा होय. 

ही खिडकी गतजन्मीच्या ऋणानुबंधाना वर्तमानातील व्यक्तींमध्ये रुजू करण्यासाठी असलेली एक वाटच आहे.

आणि ही खिडकी आहे मंगलधाम या इमारतीत राहणाऱ्या *सौ कल्याणी जोशी आणि श्री विनायक जोशी* या दाम्पत्याच्या समाधानी सदनाची.



*स्वप्निल चंद्रकांत तावडे*

📱9822253810

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा