रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

व्हाईस प्रेसिडेंट संजू सरवटे

 // श्री स्वामी समर्थ //


     *आनंदयात्री*


        *संजय मधुकर सरवटे*

         

*Vice President M.P. Birla Group* 

          

        26 August 2020


               *विनायक जोशी(vp)*

 💬9423005702

 📱9834660237


बिलासपूर येथे राहणारे , परंतु मुळचे नागपूर येथील मधुकर आणि मालती सरवटे या दांपत्याचे चुणचुणीत चिरंजीव म्हणजे संजय सरवटे. संजूला वडिलांच्या कडून संगीत व आई कडून कला आणि मामाकडून इलेक्ट्रॉनिक्स या गोष्टींचे उपजत ज्ञान प्राप्त झाले आहे .


 संजूला दोन भाऊ विजय आणि दिलीप .सर्वात मोठ्ठी बहिण म्हणजे ताई . अतिशय हुशार अशा ताईने खोखो , बॕडमिंटन या खेळात विशेष प्राविण्य मिळवले होते . ती नागपूर रेडियोस्टार होती . शिक्षण संपल्यावर राजीव पांडेजी या भारदस्त व्यक्तीची अर्धांगिनी झाली. 


 साधारणपणे तीस वर्षांपूर्वी संजयची आणि माझी ओळख विदर्भातील  "आवारपूर" या ठिकाणी लार्सन आणि टुब्रो च्या सिमेंट प्लान्ट मध्ये झाली. 


बिलासपूरहून आलेला , MSC झालेला  , चारशे ते पाचशे गाण्यांच्या मधील संगीताच्या पीसेसचे सखोल ज्ञान असलेला , अतिशय उत्कृष्ठ अशा पध्दतीने  गुळाच्या पोळ्या, लाडू , श्रीखंड  वगैरे प्रकार लिलया करणारा , सुरेख अशी पेंटींग्ज काढणारा .........


 प्रोसेस कंट्रोल प्लान्ट मध्ये एक तास जरी प्रोसेस बंद पडली तरी लाखो रुपयांचे नुकसान होते याची वस्तुनिष्ठ जाणीव असलेल्या टीमचा तो एक भाग होता. 


संजयला एक असे वरदान मिळालेले आहे कि हा मुलगा एकाच वेळेला तीन किंवा चार गोष्टींचा खोलवर विचार करुन प्राॕब्लेम सोडवत असे , अगदी Quad Core Processor सारखे एकाचवेळी पण स्वतंत्रपणे .


त्या काळात  परदेशी बनावटीच्या PLC च्या आतील साॕफ्टवेयरचा छडा लावून व ते पूर्णपणे आत्मसात करुन कंपनीला आत्मनिर्भरतेचा आनंद  त्याने सहजपणे मिळवून  दिला होता.


 आवारपूरच्या अत्यंत खडतर अशा हवामानात प्रोसेस प्लाॕन्ट मध्ये काम केलेले हे सर्व डेयर डेव्हिल्स आज वेगवेगळ्या ग्रुपचे AVP, VP,  Unit Head वगैरे जबाबदाऱ्या उत्तम प्रमाणे निभावत आहेत . 


त्याची अत्यंत आनंदी अशी अर्धांगिनी म्हणजे निशा ही वास्तूशास्त्र आणि टॕरो कार्डस या विषयात तज्ञ म्हणून काम करत आहे . मुलगा प्रथम हैद्राबाद येथे  मायक्रोसाॕफ्ट मध्ये कार्यरत आहे  आणि मुलगी इला शिकत आहे . गाण्याची तीला खूप आवड आहे .


 एकदा एका कार्यक्रमासाठी संजय सोलापूर मध्ये आमच्या घरी आला होता. अर्थातच दोन जिवलग मित्र एकत्र आल्यामुळे आईने गाणे म्हणण्याची फर्माईश केली. 


थोड्याच वेळात संजू सरवटे आणि  नारायण जोशी या दोघांनी मिळून " हृदयनाथ मंगेशकरांनी संगीत दिलेल्या " जैत रे जैत " मधले "आम्ही ठाकर ठाकर या रानाची पाखरं..." गाणे म्हणायला सुरवात केली आणि पूर्ण घर चैतन्याने भारुन गेले......  


 अर्थातच लता मंगेशकर, स्मिता पाटील ,जब्बार पटेल यांच्या सुरेख अशा सिनेमाची आणि या सिनेमातील गाणी आम्हाला म्हणून दाखवणाऱ्या *लोढा सिमेंट चे Vice Precident  असलेल्या संजय मधुकर सरवटे* या अनेकाग्रतेचा आशिर्वाद लाभलेल्या अवलियाची ही एक छोटीशी आठवण  !


*विनायक जोशी ( vp )*

  💬9423005702 

  📱9834660237

१२५७ , मंगलधाम , बी ३ , विठ्ठलवाडी , हिंगणेखुर्द , लेन नंबर ४ , पुणे ५१

*electronchikatha.blogspot.com*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा