// श्री स्वामी समर्थ //
" जय गजानन "
" गणी गण गणात बोते "
कोणत्याही कामाची सुरवात "जय गजानन " या षडाक्षरी मंत्राने केली कि अत्यंत अवघड वाटणारे काम सुद्धा निर्विघ्न पणे पार पडते याचा अनुभव माझ्या आईच्या मुळे मी असंख्य वेळेला घेतला आहे. सलग २६ वर्षे सोलापूर मध्ये आमच्या घरात
'पाडवा ते राम नवमी' असे दहा दिवस चालणारा राम नवमीचा उत्सव हा त्यांच्याच कृपेने व्यवस्थित पार पडत असे.या काळात खुपशा अनोळखी मंडळींचा घरभर वावर असे.ह्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन साधारणपणे दोन महिने आधीपासून आई करत असे.अत्यंत अनपेक्षित पणे कोणीतरी सांगितले म्हणून यावे अशा प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रातील पाहिजे असलेली नामवंत मंडळी अचानक येत असत.
" जय गजानन" या नामा बद्दल थोडाफार जरी अनुभव घ्यायचा असेल तर दासगणू रचित 'गजानन विजय' या पोथीचे वाचन अत्यंत श्रद्धेने करणे .
२००६ साली आई सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यत अंथरूणावर खिळली होती.साधारणपणे जानेवारी मध्ये
" रामनवमी" या उत्सवा बद्दल घरात चर्चा चालू झाली.थोड्याच दिवसात गजानन महाराजांच्या कृपेने आणि योग्य ते औषधोपचार घेतल्याने ती खडखडीत बरी होऊन सोलापूरला उत्सवाला जाण्यासाठी तयार झाली. अर्थातच "अपर्णा रामतिर्थकर "वगैरे मंडळींनी स्वतः होऊन भेटून उत्तम अशी प्रवचने त्या वर्षी सादर केली.
आज गजानन महाराज प्रकट दिना निमित्ताने गजानन महाराजांचे श्रद्धा
पूर्वक स्मरण करून अतिशय आनंदाने आणि समाधान पूर्वक आपले काम करत रहायचे!
विनायक जोशी (vp )
29 February 2016
electronchikatha.blogspot.com
सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६
"शेगावचे गजानन महाराज "
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६
चांदीयुक्त पाणी !!!
// श्री स्वामी समर्थ //
" चांदीचे पाणी "
'Silver Water '
पुण्याच्या कोरेगाव पार्क या भागात गेलात की रजनिश शिष्यांचे दर्शन होते.हि बहुतांश मंडळी आश्रमाच्या बाहेर हिंडताना आपली बिसलेरीची पाण्याची बाटली घेतात .त्या मध्ये दोन बुचे " चांदीचे पाणी " घालतात . या नंतर साधारणपणे अर्ध्या तासाने हे पाणी पितात. अठरा वर्षापूर्वी या आश्रमातील देवयानो नावाच्या जर्मन शिष्याने अक्षय खरचे आणि संजय लचके या दोन हरहून्नरी आणि तडफदार इंजिनियर्स च्या मदतीने शुद्ध चांदी योग्य प्रमाणात पाण्यात उतरवण्यासाठीचे इलेक्ट्रॉनीक मशिन तयार केले.चांदीचे पाण्यात किती प्रमाण पाहीजे वगैरे गोष्टींची सातत्याने माहीती गोळा केली.या पाण्याच्या वापराने रोग प्रतिकारक शक्ती उत्तम प्रमाणात वाढते.किडनी ,लिव्हर ,डेंग्यू वगैरे आजारात पूरक म्हणून हे चांदीचे पाणी खुपच उपयुक्त ठरत आहे.गेली दहा वर्षे संजय लचके हे शुद्ध चांदी आणि दोन वेळा शुद्ध केलेले पाणी वापरुन स्वतःच या पाण्याच्या बाटल्या तयार करत आहेत. असंख्य विदेशी नागरीक पुण्यात आणि गोव्यात त्यांचे गिऱ्हाईक आहे. फक्त ६०० रुपयात अर्धा लिटरची ही बहुगुणी आणि उपयुक्त पाण्याची बाटली मिळते. दररोज सकाळी फक्त एक चमचाभर या प्रमाणात घेतलेल्या पाण्याच्या मुळे प्रतिकारशक्ती सुद्धा उत्तम रहाते असा यांचा दावा आहे. अतिशय लहानमुले किंवा प्रेग्नंट बायका सोडून कोणीही हे पाणी प्रमाणात वापरुन आरोग्य संपन्न राहू शकता.आपल्या कडे पारंपारिक पद्धतीत चांदीच्या तांब्यात रात्रभर पाणी ठेवून प्यावे वगैरे गोष्टी आहेत .
"पारसमणी " या नावाने संजय लचके यांनी बनवलेल्या असंख्य बाटल्या आज बाजारात उपलब्ध आहेत.जर कोणालाही या विषयात जास्त ज्ञान किंवा हे पाणी पाहीजे असल्यास संजय लचके यांना संपर्क करु शकता.
संजय सदाशिव लचके
सेल नंः 9325501076
विनायक जोशी (vp ).
27 february 2016
electronchikatha.blogspot.com
Optical Isolation अदृश्य भिंत !
// श्री स्वामी समर्थन //
"अदृश्य दणकट भिंत"
"Optical Isolation"
जम्मू पासून तूतिकोरीन पर्यंत आमची ॲटोमॕटिक पॕकेजिंगची मशिन्स उत्तमपणे चालत होती. केंद्र सरकारने सर्व प्रकारचा अभ्यास करुन polythene बँग मधे खाण्यास योग्य असे oil भरायला परवानगी दिली होती. फक्त oil भरण्यासाठी वेगळ्या प्रकारचा पेपर वापरावा लागणार होता आणि oil हे ठराविक उष्णतामान ठेवून भरावे लागणार होते. मशिनचा वेग दुधाच्या मशिन पेक्षा खूपच कमी असणार होता.आमच्या मूळ मशीन मधे पिशवी व्यवस्थित सिल होण्यासाठी काही बदल करावे लागले होते. आम्हाला पहिली आॕर्डर मद्रास आँइल मिलची मिळाली होती. जाड पेपर रोल आमच्याकडे पुरेसा नसल्यामुळे सरळ गिऱ्हाईका कडेच ट्रायल्स घ्यायचे ठरले. आमची इलेक्ट्रॉनीक प्रणाली कमी व्होल्टेज वरती म्हणजे पाच व्होल्ट वरती चालणारी होती. Customer कडे trials चालू असतानाच आमचा कंट्रोलर व्यवस्थित चालत नाहीये हे लक्षात आले.नवीन दूसरा कंट्रोलर घेउन आमचा इंजिनियर तेथे गेला . तोही तेथे चालला नाही. दुधाच्या मशिनसाठी याच प्रकारचे पाचशे पेक्षा जास्त कंट्रोलर चालू अवस्थेत होते. साइट वरती बरेच दिवस गेल्यावर लक्षात आले की oil भरायसाठी वापरला जाणारा जाड पेपर आणि रबर रोलर यांच्या घर्षणामुळे अतिशय जास्त voltage चा Static Charge तयार होत होता. त्या मुळे कंट्रोलर बंद पडत होता. वेगवेगळ्या प्रकारचे बदल करुन बघितले जात होते. शेवटी मशिन वरील सर्व signals हे 24 व्होल्टस आणि opto coupler च्या सहाय्याने कंट्रोलरला जोडायचा उपाय योग्य ठरला. या नंतर मात्र मशिन अतिशय उत्तम चालू लागले.या अनुभवा नंतर पुढील सर्व मशिन्स मध्ये मशिन वरुन येणारे किंवा जाणारे signals opto coupler मधूनच नेण्याचे ठरवले. Infra ray या संकल्पने वर चालणाऱ्या opto coupler ने त्या नंतरच्या हजारो controller ना भयमुक्त आयुष्य प्रदान केले. या एका प्रसंगा नंतर सर्व डिझाईन्स मधे opto coupler नावाच्या अदृश्य भिंतीला कायमचे आदराचे स्थान मिळाले.
विनायक जोशी (vp)
26 September 2015
electronchikatha.blogspot.com
Diode Bridge !!
// श्री स्वामी समर्थ //
" Diode Bridge "
Sine wave नावाच्या अतिशय सुंदर आणि अवखळ अशा Wave ला शांत अशा DC मध्ये रुपांतरीत करण्याचे काम हे Diode Bridge करतात. चौघांनी मिळून दोन थरांच्या दहिहंडीची तयारी करावी तसे ते एकमेकांच्या खांद्यावर ऊभे असतात.
ठरावीक amplitude च्या टेकडीवर चढणारी आणि परत तेवढयाच खोलीच्या दरीत जाणाऱ्या Sine wave ला न दुखावता ह्या Diode bridge ला काम करावे लागते. Diode हे स्वतः फक्त positive विचारसरणीचे असल्यामुळे Sine wave चा दरीकडे जाणारा मार्ग बंद करुन तेवढयाच वेळात दोनदा Pulsating DC नावाच्या टेकडीवर नेऊन परत जमीनीवर घेऊन येतात. यांच्या Output ला एखादा कपॕसिटर नावाचा मित्र ऊभा असेल तर मात्र या Pulsating DC चे रुपांतर करवतीच्या दातां सारखे दिसु लागते . या Saw tooth waveform ला रीपल म्हणून ओळखले जाते. कपँसिटर चे आकारमान कमी असेल तर मात्र जास्त रीपल ची Triangular wave असे याचे बारसे होते. Sine wave चे चैतन्य कायम ठेवून output ला सौम्य बदलत रहाणारे DC voltage पाहीजे असेल तर अचूक आकारमानाचा कपॕसिटर वापरावा आणि Saw tooth च्या रुपात खळाळत्या पाण्या सारखे DC voltage ने प्रवाही रहावे !
विनायक जोशी ( vp)
16 November 2015
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, २६ फेब्रुवारी, २०१६
इलेक्ट्रॉनीक्स लाटा
// श्री स्वामी समर्थ /
" इलेक्ट्रॉनीक लाटा "
१) Sine wave - अतिशय सौम्य आणि समजुतदार.यशाच्या टोकावर असताना किंवा निराशेच्या दरीत सुध्दा स्थिर रहाणारी .सर्व कामांना power full पाठिंबा देणारी.
२) " S" curve - दिसायला साधारणपणे साइन सारखीच परंतू वेगवान .DC servo वगैरे High speed applications मधे उपयुक्त .मेकँनिकल गोष्टींची झीज कमीतकमी व्हावी याची काळजी घेणारी
३) Trapezoid - मोठे पठार असलेली टेकडी. Acceleration आणि deceleration अशा चढ आणि उतारांच्या बरोबरीने काम करणारी .
४) Square wave - अत्याधुनिक अशा Digital electronics चा पाया आसलेली .पूर्णपणे व्यावसायिक वृत्तीने वागणारी. Rising edge किंवा Falling edge अतिशय गडबडीने पार करणारी. धारधार टोके असलेली.
५) Triangular wave - Switching Regulators मधे स्थिर आधार देणारी किंवा साध्या regulator मधे पूर्ण क्षमतेने वापरली जाणारी.
६) Saw tooth - Precision timers चा आत्मा असलेली. एखाद्या feedback voltage ckt चे square wave output मधे रुपांतर करणारी .
७) Asymmetric square - sine wave ने झीरो पोझीशन पार केली का हे दरवेळेला सांगणारी. या वरुन फायरींग अँगल अचूक ठेवण्यासाठी मदत करणारी .
अशा वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनीक लाटांच्या मदतीनेच कंट्रोल सर्किट आँपरेट होते.
विनायक जोशी (vp)
16 November 2015
electronchikatha.blogspot.com
Virtual World किंवा आभासी जग !
// श्री स्वामी समर्थ //
" Virtual World "
"आभासी जग"
आपल्या शरीराच्या आत असे एकही ज्ञानेंद्रिय नाही जे डीजीटल नावाच्या
अनैसर्गिक प्रकाराला प्रतिसाद देते. आपल्या शरीराच्या आतील सर्व सेन्सर्स हे ॲनालाॕग प्रकारचे आहेत. त्या मुळेच अतिशय बारीकसारीक संवेदना आपला मेंदू जाणू शकतो आणि त्याच्या वरती योग्य ती प्रतिक्रिया देतो. इलेक्ट्रॉनीक circuit designs करताना पहिल्यांदा ground आणि virtual ground समजावून घ्यावी लागते. याच प्रमाणे वास्तविक आणि आभासी जग या बद्दलच्या संकल्पना समजावून घ्याव्या लागतात. एखादी अवघड संकल्पना या virtual machines मुळे समजण्यास अत्यंत सोप्या जातात . आभास हा भास नाहीये तर ते उपयोगी पडणारे अस्तित्व आहे याचा अनुभव यायला लागतो !
विनायक जोशी (vp)
11september 2015
electronchikatha.blogspot.com
गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६
टाॕम आणि जेरी फक्त !!
// SSS //
" टाॕम आणि जेरी "
तुम्हाला दोघांना बघितले आणि उत्कट प्रेम म्हणजे काय याचा साक्षात्कार झाला. भविष्याची काळजी न करणारी आणि भुतकाळात न रमणारी अशी तुमची अजरामर जोडी आहे.कायम वर्तमानात रहाणारे.
" जेरी " चे जेरीस आणणे आणि टाँम ने त्या सर्व हरकतींना उत्साहाने तोंड देणे लाजवाब. तुमच्या कल्पना शक्ती ला मात्र तोड नाही. तुमच्या गोष्टींमधे उपदेशाचे डोस नाहीत किंवा उगीचच करुण रसाकडे कधीही गेल्या नाहीत. या जगात आम्हाला आनंदाने जगायचे असेल तर आलटून पालटून आम्ही पण कधी "टाँम" तर कधी "जेरी "व्हायला पाहीजे असे वाटते. एकही शब्द न बोलता सुध्दा जगातल्या सर्व वयोगटातील रसिकांच्या मनावर गेली कित्येक वर्षे तुम्ही राज्य करत आहात. चँपलिन नावाच्या अशाच एका राजाने तुमच्या बरोबरीने आमच्या वर राज्य केले आहे. तुमच्या सारख्या उत्साहाने जगणाऱ्या मंडळींच्या सहवासात आषाढातल्या काळ्या ढगांना दूर सारुन आम्ही "श्रावण मासी हर्ष मानसी " या ओळी गुणगुणत पावसाची वाट बघत आहोत.!! हेच पत्र तुमच्या आयांना दाखवा आणि दिवे लागणीला आठवणीने दृष्ट काढून घ्या !!
विनायक जोशी (vp)
7 August 2015
" रंग आणि तरंग "
// श्री स्वामी समर्थ //
" रंग - तरंग "
'colours - wavelength'
रंगाची ईमेज ही त्याच्या वरती पडणारा प्रकाश आणि त्याच्या मधून निघणाऱ्या तरंगांच्या बद्दल आकलन करणाऱ्या डोळ्यातील Receptors वरती अवलंबून असते वगैरे तांत्रिक पुस्तकी ज्ञानाची पहिली झलक हाय स्पिड मशिन वरती काम करताना तपासून बघता आली. या प्रत्येक मशिन वरती बरेच इलेक्ट्रॉनीक डोळे किंवा Photo eye बसवलेले असतात. अतिशय वेगाने जाणारे रंगाचे ठिपके टिपणे आणि त्या प्रमाणे योग्य उपाययोजना अत्यंत कमी वेळात करणे ही निरंतर कामगिरी ते सातत्याने करत असतात.Printing Technology अति प्रगत करण्यात या रंगित ठिपक्यांचा आणि इलेक्ट्रॉनीक डोळ्यांचा सिंहाचा वाटा आहे.कँरीयर , माँड्युलेशन आणि डी-माँड्युलेशन चा वापर करुन , मशिन चालू असतानाच सतत corrective actions यांच्या मुळे घेता येतात. इलेक्ट्रॉनीक डोळा किंवा Photo eye बनविण्यासाठी इलेक्ट्रॉनीक्स , फीजीक्स , आॕप्टिक्स आणि मेकॕनिकल वगैरे गोष्टींची खोलवर माहिती लागते. स्थिर आणि चल गोष्टींच्या बद्दल चांगलाच अभ्यास लागतो.अर्थातच सहजासहजी डोळ्यांना न दिसणाऱ्या अनावश्यक तरंगा पासून दूर रहाण्यासाठी precision filters ची माहिती करुन घ्यावी लागते . एकदा तुम्ही या रंगांच्या आणि त्यातून निघणाऱ्या तरंगांच्या अद्भुत जगात प्रवास अवश्य करा.
विनायक जोशी (vp)
5 October 2015
electronchikatha.blogspot.com
बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६
केंकरे सर IIT Kharagpur !!
// श्री स्वामी समर्थ //
"केंकरे सर"
"IIT Kharagpur 1972 "
साधारणपणे सहा फूट उंची आणि त्याला अनुसरून व्यवस्थित तब्येत. माझ्या कल्पने प्रमाणे कंपनीतील पहिला IIT. त्या काळात शेतकऱ्यांना दुधाच्या ॲटोमेटीक मशिनची आणि पिशव्यांची उपयुक्तता पटवून देतानाची एक व्हिडीयो कॕसेट कंपनीने काढली होती त्या मध्ये त्यांचे दर्शन पहिल्यांदा झाले. कोणीही पाहूणे आले की त्यांना नवीन कामांची माहिती देणे वगैरे कामे त्यांना करावी लागत. त्या काळी 8085 हा प्रोसेसर नुकताच आला होता . तो वापरुन पॕकेजींग मशीनचे कंट्रोलर करायचे ठरले. यावेळी त्यांच्या हाताखाली माझी नेमणूक झाली. अप्पा बळवंत चौकातून मोठा फळा आणून आमचा क्लास चालू झाला. अर्थातच या क्लास मध्ये ७१ चे युध्द किंवा त्या मुळे खरगपुर IIT मध्ये असलेले black out किंवा त्या काळातील तीन मजली computation मशिन्स वगैरे विषयाचे सुध्दा ज्ञान घेणे चालू होते. आमच्या दोघांची वेव्हलेंग्थ जमायचे एक कारण म्हणजे अतिशय किरकोळ किंवा फालतू गोष्ट असेल तरीहि भरपूर हसणे. कोणत्याही गोष्टी बद्दल अतिशय खोल विचार करणे आणि उत्तम documentation . या विषयांची आवड त्यांच्याच मुळे वाढली . एखाद्या LED कडे बघून साधारण मिली सेकंदां मध्ये On time सांगणे, एखाद्या गोष्टीला हात लावून अंदाजे त्याचे Temperature सांगणे , कानाला ऐकू येणाऱ्या Solenoids च्या आवाजावरुन मशीनच्या तब्येती बद्दलचे आडाखे बांधणे वगैरे गोष्टी त्यांच्या मुळेच शिकता आल्या . थोडक्यात माझ्या आयुष्यात मशीन सुध्दा बोलतात या पर्वाची सुरवात त्याकाळात झाली . फ्लो चार्ट काढणे , हँड कोडींग करणे ,वेगवेगळ्या नाॕपची जागा ठेवणे वगैरे कष्टदायक आणि कंटाळवाण्या गोष्टी ते चिकाटीने करत असत. अत्यंत आनंदाने गडगडाटी हसणाऱ्या आणि अत्यंत परफेक्ट काम करणाऱ्या या माणसा मुळे IIT खरगपुर ही दिलदार आणि उमद्या मंडळींची संस्था आहे असा कायमचा ठसा उमटला ! आजही बरीच आकडेमोड करुन एखाद्या कांपोनंटची अव्यवहार्य किंवा अवास्तव व्हॕल्यू येते त्या वेळी केंकरे सरांची आणि गडगडाटी हसण्याची आठवण येते !!!!
विनायक जोशी (vp )
24 february 2016
electronchikatha.blogspot.com
मंगळवार, २३ फेब्रुवारी, २०१६
Tetra Pack आणि पोखरण
// श्री स्वामी समर्थ //
" Tetra Pack - Nichrome "
Nichrome या कंपनीने साखर कारखाने उभे करता करता एकदम निळ्या ज्योतीचे स्टोव्ह बनवायला सुरवात केली.
याच वेळी सरकारने लघु उद्योगांना दिलेल्या संरक्षणामुळे Form Fill Seal ही ॲटोमॕटीक मशीन्स करायला सुरवात केली. या मधील सर्व भाग स्वतःच्या वर्कशाॕप मध्ये तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन करुन त्या नुसार गुणवत्ता पूर्ण उत्पादन चालू केले. Voltas या कंपनीला आमच्या मशिन्सचे Sales आणि Servicing दिल्यामुळे थोड्याच काळात पूर्ण भारतभर आमच्या कंपनीच्या मशिन्स आनंदाने नांदू लागल्या . याच क्षेत्रातील नामवंत कंपनी म्हणजे Tetra Pack. या कंपनीने भारतातील विश्वासार्ह कंपनी म्हणून आमच्या कंपनी बरोबर भागीदारी केली. सात थरांचे पेपर वापरुन दीर्घकाळ खाद्य पदार्थ किंवा दूध वगैरे दैनंदिन लागणाऱ्या वस्तू टिकविण्यासाठीचे तंत्रज्ञान त्यांच्याकडे होते. कंपनीमधे अतिशय उत्साहाचे वातावरण होते.पुण्याच्या जवळ शिरवळ पाशी ' विंग' नावाच्या गावात महिन्याला शंभर मशिन्स बनवता येतिल आणि पूर्ण जगभर विकता येईल असा महत्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याची सुरवात झाली. 'असेप्टीक 'पॕकेजिंग नावाच्या प्रकाराची पहिल्यांदाच तोंडओळख झाली. बॕक्टेरीया पासून मुक्त असे पँकिंग करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन पार्टसची माहिती घेणे चालू होते.परंतु अचानक एके दिवशी आपल्या आदरणीय पंतप्रधानांनी "अटलजींनी" पोखरण येथे अणुस्फोट घडवून संपूर्ण जगाला भारताच्या ताकदीची जाणीव करुन दिली. अर्थातच आपल्या देशाला विकसित देशांनी मदत देणे ताबडतोब बंद केले.याचवेळी Tetra Pack ने सुद्धा आमच्या बरोबरील करार गुंडाळून ते निघून गेले. पोखरण स्फोटा नंतर जगभरातील मंडळींनी लादलेल्या बंदीला देशातील सर्व तळागाळातली मंडळी सुद्धा एक आव्हान म्हणून सामोरे गेली. या संधीचा फायदा उठवून आम्ही "अंडयाचा बलक "भरायची मशीन रशियाला निर्यात केली. पोखरणचा स्फोट हा फक्त बाजपेयींचा , कलाम, काकोडकरांचा नव्हता तर तो संपूर्ण भारताचा होता.थोड्या दिवसांनी वास्तवाची जाणीव झाल्यावर आणि शंभर कोटी लोकसंख्या असलेल्या गिऱ्हाईकाला दुखावणे परवडणारे नव्हते याची कल्पना येऊन परदेशी कंपन्या भारतात परतल्या. या वेळेपर्यंत आम्ही आत्मनिर्भर होऊन व स्वतःच्या पायावर खंबिर पणाने उभे राहून बाहेरील देशात निर्यात चालू केली होती . Tetra pack हा विषय आमच्या कंपनी साठी संपलेला होता.!!
विनायक जोशी (vp)
28 August 2015
electronchikatha.blogspot.com
सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६
" Creativity " च्या रस्त्यावर !!!
// श्री स्वामी समर्थ //
"Creativity "
1) अपूर्णतेकडून पूर्णत्वाकडे
2)अनेकाग्रते कडून एकाग्रतेकडे
3)प्रचंड वेदना देणारी
4) कायम अस्वस्थ ठेवणारी
5)बाह्य संवेदना बंद ठेवणारी
6)खुप गर्दीत सुध्दा एकटेपणा
7)अलौकिक आनंद देणारी
8)अतार्किक अनूभव देणारी
9)क्षणभरासाठी दिव्यत्वाची अनुभुती देणारी
10)परमेश्वराशी अनुसंधान
11) ऐहीक गोष्टींची अनासक्ती वाढवणारी आणि
या सर्व असामान्य अनुभवा नंतर व्यवहारी जगात सामान्य ठेवणारी म्हणजेच "Creativity "
विनायक जोशी (vp)
२४ जून २०१५
electronchikatha.blogspot.com
बॕटरीजची मिटींग Super capacitor बद्दल !
// श्री स्वामी समर्थ //
"बॕटरीजची महत्त्वाची मिटिंग "
अतिशय महत्त्वाची, असा संदेश गेल्यामुळे सर्व जण गंभीरपणे येत होते. सुरवातीला स्कुटर ,मोटर सायकल पासून ते ट्रक पर्यंतच्या बॕटरीजनी प्रवेश केला, त्या नंतर पेन सेल, रेडीओचे सेल, पाठोपाठ घडयाळाचे छोटे सेल आपल्या बरोबर रॕमच्या सेलना घेऊन आले .अतिशय भपकेबाज गाडीतून सोलर सेल आले., पाठोपाठ इलेक्ट्रॉनीक मिटर्स मधे लागणारे सेल आले. शेवटच्या क्षणी गडबडीने UPS सेल आले . साधारणपणे मिटिंगला लागणारा कोरम पूर्ण झाल्यामुळे वेळेवर मिटींगची सुरवात झाली . सुरवातीला मनुष्याच्या हितासाठी तयार झालेल्या आणि पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या ' Green " बँटरीजचे भाषण झाले. या नंतर नविन येणाऱ्या आगंतूक अशा पाव्हण्या बद्दल सखोल चर्चा झाली.त्या नतर आपल्या मुल तत्त्वाला धक्का लावणाऱ्या परंतु अतिशय छोट्या अशा दिसणाऱ्या वस्तूच्या सभोवती सर्व जण गंभीरपणे उभे राहिले. हा नवीन येणारा Device फक्त १० सेकंदात Charge होणार होता . याची कपॕसीटी सध्या अतिशय कमी आहे. किंमत खूप आहे वगेरे बाबींची चर्चा झाली. मिटिंग मधून बाहेर पडताना सर्व जण त्याला वेगवेगळ्या बाजूने हाताळून पहात होते आणि अतिशय गंभीरपणे बाहेर पडताना सर्वांच्या मध्ये त्याचीच चर्चा होती .ज्याचे नाव आहे "Super Capacitor"!
विनायक जोशी (vp)
२० जून २०१५
electronchikatha.blogspot.com
Soldering एक कला !
// श्री स्वामी समर्थ //
" Soldering "
Soldering ही अतिशय सुंदर आणि अवघड कला आहे. याच्या मध्ये टिन किंवा लीड आहे का ? याच्या मधून बाहेर निघणारा धूर घातक आहे का ? वगैरे प्रश्न पडायच्या आधीच मी चांगले
Soldering करायला शिकलो. १९८३ साली कंपनीमधे कामाला लागल्या नंतर पहिल्याच महिन्यात "चारुहास आलेगावकर "या मुलाने तयार केलेला one micro second ची अचूकता मोजणारा counter उघडून बघितला . पिसिबी आणि वायरींग soldering चा तो आदर्श नमुना होता.अत्यंत तेजस्वी असा Soldering चा तो अविष्कार होता. बरोबर २० वर्षांनी म्हणजे २००३ मधे त्या काउंटर मधील Soldering तसेच चैतन्य दायी होते. Soldering करताना डाव्या हाताचा आंगठा आणि पहिल्या बोटात Solder धरायचे आणि करंगळी आणि अनामिकेने कंपोनंटला आधार द्यायचा. उजव्या हाताने soldering करायचे.solder चा ठिपका मारणे आणि ते थंड होण्यासाठी वेळ देणे इथेच जातिवंत कलाकार मंडळींचा खेळ चालू होतो. चांगले Soldering म्हणजे काय असा प्रश्न खरगपूर IIT मधून आलेल्या केंकरे सरांना विचारले आणि त्यांनी शुद्ध मराठीत २५ पाने Soldering बद्दल लिहून दिली होती. नारायण देशपांडे या बहाद्दरांने Soldering केलेले CPU card हे मशिनवर तयार केलेले नाही आहे याची खात्री करण्यासाठी विदेशी पाहूणे आमच्या येथे येऊन खात्री करुन गेले. Soldering हे कांपोनंट आणि पीसीबी यांच्या मधील कायमचे नातेसंबंध जुळवणारा महत्त्वाचा दुवा आहे .
विनायक जोशी (vp)
6 October 2015
electronchikatha.blogspot.com
आनंदी सप्ताह निखिल आणि सर्वेश बरोबर
// श्री स्वामी समर्थ //
" निखिल आणि सर्वेश "
"आनंदी सप्ताह "
बरोबर मागच्या शनिवारी म्हणजे २० मे रोजी कल्याणीच्या भाच्यांनी पुण्यात प्रवेश केला. आई वडिलांना सोडून हे दोघे आले. एकटे राहिले आणि आठ दिवसांत इथल्या खूप गोष्टींवर आपला ठसा सोडून गेले.
आमच्या बरोबर राहिल्याने सकाळी लवकर उठून दररोज वेगवेगळ्या ठिकाणांच्या वाऱ्या घडवून आणल्या .अगदी पर्वती पासून ते सारस बाग, तळजाई, वाघजाई, विठ्ठल मंदीर,दगडूशेठ,जोगेश्वरी वगैरे ठिकाणे झाली. नंतर बालाजी,मोदी गणपती ,अभिरुची माँल . दुपारी पत्ते , संध्याकाळी cricket आणि रात्री दहा नंतर बँडमिंटन असा फुल to धमाल कार्यक्रम होता .
आज सकाळी लवकरच त्यांना सोडायला स्वारगेट ला गेलो. गाडी यायला एक तास उशीर होता. बरेच वेळेला 'निरोप' घेताना हा उशीर छान वाटतो .शेवटच्या क्षणा पर्यंत गप्पा चालू रहातात. माझ्या मधील खोडकर मुलामुळे आमची वेव्हलेंग्थ लगेचच मॕच झाली.
शेवटी मायकेल शूमाकरला लाजवेल अशा झोकात ड्रायव्हर ने St आणली.
एका आनंददायी सहवासाची हि तात्पुरती समाप्ती होती . अर्थातच वळण जसे सरळ नसते तसाच निरोप सुध्दा कधीही आनंदी नसतो !!
विनायक जोशी
२४ मे २०१५
electronchikatha.blogspot.com
Valve
// श्री स्वामी समर्थ //
" एकमार्गी व्हाॕल्व्ह "
एकाच सरळसोट दिशेने जायची शिस्त आयुष्यभर पाळणारा म्हणजे Valve. सायकल पासून ते लाखो रुपयांच्या गाड्यां मधील हवा Tube च्या आतच अडवून धरणारा हा valve. पाणीपुरवठा करताना याचे नाव बदलून हा पट्टीचा Valve होतो. प्रेशरकुकरमध्ये हा रीलीफ Valve म्हणून काम करताना आपल्याला सुरक्षित ठेवतो. जुन्या TV मध्ये मात्र डायोड या नावाने काचेच्या हंडीत बसून सुंदर प्रकाशमान होणारा हा valve . या नंतर मात्र आकाराने छोटा आणि रंगाने काळा आणि गळ्यात पांढरा मफलर बांधून सेमी कंडक्टर डायोड म्हणून आला. या नंतर मात्र या डायोड च्या रुपातील एक मार्गी Valve ने इलेक्ट्रॉनीक क्षेत्रात खुप मोठी क्राँती घडवली. अजिबात कौतुकाची अपेक्षा न करता आणि अतिशय सामान्य वागणूक मिळून सुद्धा सर्व सामान्यांना परवडेल एवढीच माफक फी घेणाऱ्या आणि मागे वळून न बघता सरळ प्रगतीच्या दिशेने मार्गस्थ होणाऱ्या valve चे नित्य स्मरण अतिशय जरुरी आहे.!
विनायक जोशी (vp)
22 September 2015
electronchikatha.blogspot.com