सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६

" तायक्वोंदो " मेन स्ट्रीट कँप !

// श्री स्वामी समर्थ //
          " तायक्वोंदो "
  मी १९८५ ते ८७ या काळात पुणे कँप मध्ये ' Main street ' वरती रहात होतो. याच रस्त्यावर नामदेव शिंपी समाजाचे राममंदीर नावाचे अतिशय सुंदर असे मंंदिर आहे . त्याच्या वरती एक मोठा हाँल आहे. या हाँल मधे संध्याकाळी ७ ते ८ या वेळात 'कमल घोष' नावाचा उत्साहाने सळसळणारा तरुण तायक्वोंदो शिकवत असे. संजय लचके या माझ्या मित्राच्या मुळे मला तेथे प्रवेश मिळाला.Self defence साठीच याचा वापर करायचा वगैरे गोष्टी वदवून घेतल्या जात. पहिल्यांदा warm up , त्या नंतर stretching , frog jump वगैरे प्रकार असत.या नंतर पंधरा मिनीटे स्वसंरक्षण कसे करावे याच्या बद्दल  वेगवेगळ्या प्रकाराची माहिती आणि सराव . या सरावात बरोबर एक मिनीटासाठी ५ ते ६ जण आपल्या वरती चारी बाजूनी हल्ला करतात आणि आपण आपले संरक्षण करायचे.या काळात अंग भरपूर सडकून निघत असे .या नंतर cool down या प्रकारचे व्यायाम .हे सर्व प्रकार झाल्यावर राममंदीराचे दोन लाकडी जिने उतरणे अशक्य होत असे. शरीराला लवचिकपणा आणि बळकटपणा देणाऱ्या या व्यायामानंतर मारामारी करायची खुमखुमी येत असे. कँप सोडल्या नंतर तायक्वोंदो हळुहळु बंद पडले.या खेळामुळे सर्व बाजूनी आपल्या वरती हल्ला होत असताना शांतपणाने स्वसंरक्षण कसे करायचे याचे आयुष्यात ऊपयोगी पडणारे शिक्षण मिळाले. काल संजयच्या  आई वडीलांना भेटायला कँप मधे गेलो होतो.त्या नंतर राममंदिरा मधे गेलो .रामरायाचे दर्शन झाल्यावर पहिल्या मजल्यावर असलेल्या हाँल मधे गेलो .त्या रिकाम्या हाँल मधे 'रेडडंँन' असणारा कमल घोष आणि तरुण नामदेव शिंपी समाजाची मुले यांच्या बरोबरील असंख्य आठवणी फक्त शिल्लक होत्या !
विनायक जोशी (vp)
14 November 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा