सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

Introduction to FIM

// SSS //
  " FIM चा जन्म "
Field interfacing modules चा जन्म . आमच्या कंपनीला ठाणे येथिल अत्तर बनविण्यासाठी प्रसिध्द असलेल्या कंपनीचे काम मिळाले होते. हा अत्तर तयार करायचा formula  फक्त ठराविक मालक मंडळींच्या जवळच ठेवायचा असल्यामुळे एक अँटोमेटीक मशीन पाहीजे होते. साधारणपणे २० मीटर लांब असे रेल होते. त्याच्या वरून एक SS Trolley जाणार होती.Trolley च्या वरती थोड्या उंचीवर थोड्या थोड्या अंतरावर टँक होते.त्या Tanks मधे वेगवेगळी chemicals  होती.एखाद्या अत्तराचा formulae भरला की respective टँक मधील योग्य प्रमाणात केमिकल्स गोळा करत ती trolley शेवट पर्यंत जास्तवर एका प्रकारचे अत्तर तयार होत असे.अतिशय महागडे असे मशीन असल्यामुळे त्याला त्या काळातील सुप्रसिद्ध कंपनीचा PLC वापरला होता.सर्व parameters व्यवस्थित भरुन खुप वेळा चेकींग झाले होते.सर्व trials झाल्या त्या नंतर फक्त mechanical फिनिशींग वगैरे कामे झाली आणि फायनल चेकींगच्या वेळी मशीन बंद पडलेले आढळले.अर्थातच PLC वाली मंडळी आली आणि input module जळाले आहे असे सांगितले .नवीन module ची किंमत साधारणपणे अठरा हजार रुपये होती.welding करताना earth चुकीची जोडली त्या मुळे module बंद पडले होते.या वेळेला मशीन वरती काहीही घडले तरी PLC सुरक्षित रहावा म्हणून बाहेरून optical isolation modules आम्ही लावायची ठरवली. PLC ला येणारा आणि जाणारा प्रत्येक signal ला field पासून वेगळे केले.या एका बदलामुळे आमची मेकँनिकल ची मंडळी सुध्दा खुश झाली आणि पहिल्या सारखी मुक्त पणे काम करू लागली. PLC servicing हा प्रकार अतिशय कमी झाला. पुढच्या मशीन साठी या module चे बारसे झाले . त्याचे नाव होते FIM,
      विनायक जोशी (vp)
        9423005702
          २० जूलै २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा