सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

कमिटमेंट उर्फ बाबा फाटक

// SSS //
  " बाबा फाटक "
    " कमिटमेंट "
"राजा फाटक" या नावाप्रमाणे राजा असलेल्या माणसाचे ते मोठे चिरंजीव . कुरुंदवाड नावाच्या अत्यंत सधन गावात त्यांचे अतिशय  मोठे मेडीकल दुकान गेली ७० वर्षाहुनही अधिक काळ आहे. दररोज सकाळी ते नृसिंहवाडीच्या दत्तप्रभूंच्या देवळासमोरील घाटावरती पोहून आणि "दत्त महाराजांना " दंडवत घालून बरोबर सकाळी ९ वाजता दुकान उघडत आहेत.
आजूबाजूच्या २०-२५ खेडे गावांमधून येणारे त्यांचे customers आहेत.  दुकानात काळानुरुप computers आणि त्याला लागणारी software वापरत आहेत. त्यांच्या मनमोकळ्या  स्वभावा मुळे खुप मोठा असा लोकसंग्रह आहे. रात्री -अपरात्री गावाकडून येणाऱ्या customers ना सुद्धा ते न कंटाळता सेवा देत आहेत. कदाचित 'गीतेतील 'एकही अध्याय पाठ नसणाऱ्या या माणसाने आपल्या आचरणाने 'भक्तीयोग 'आणि 'कर्मयोग ' मात्र अचूक साधला आहे. सध्या मुख्य  दुकानाचा  सर्व भार  मुलावर आणि नातवंडावर सोडला आहे. अतिशय उत्तम पणे स्वतःचा संसार करत सर्व लहान भावंडांची जबाबदारी सुध्दा कोणतीही कसूर न ठेवता पार पाडली आहे. चौथी पिढी याच व्यवसायात पदार्पण करत आहे. अतिशय उत्तम साथ देणाऱ्या जोडीदारीणी मुळे समाधान पूर्वक आयुष्य चालू आहे.आधुनिकतेची आवड असलेल्या नविन पिढी बरोबरीने त्यांनी उत्तम प्रकारे जुळवून  घेतले आहे.
एका छोट्या खेड्यात रहात असून सुध्दा कायम खेळांबद्दल उत्तम प्रकारची आवड जोपासली आहे. त्यांच्या प्रोत्साहनामुळे त्यांची एक मुलगी volley ball मधील National player झालेली आहे.
माझ्या साठी  बाबा म्हणजे "commitment 'चा आदर्श वस्तूपाठ आहे.!
           विनायक जोशी (vp)
             16 February 2016
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा