सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

बॕटरीजची मिटींग Super capacitor बद्दल !

// श्री स्वामी समर्थ //
   "बॕटरीजची महत्त्वाची  मिटिंग "
अतिशय महत्त्वाची, असा संदेश गेल्यामुळे सर्व जण गंभीरपणे येत होते. सुरवातीला स्कुटर ,मोटर सायकल पासून ते ट्रक पर्यंतच्या बॕटरीजनी प्रवेश केला, त्या नंतर पेन सेल, रेडीओचे सेल, पाठोपाठ घडयाळाचे छोटे सेल आपल्या बरोबर रॕमच्या सेलना घेऊन आले .अतिशय भपकेबाज गाडीतून सोलर सेल आले., पाठोपाठ इलेक्ट्रॉनीक मिटर्स मधे लागणारे सेल आले. शेवटच्या क्षणी  गडबडीने UPS सेल आले  . साधारणपणे  मिटिंगला लागणारा कोरम पूर्ण झाल्यामुळे वेळेवर मिटींगची सुरवात झाली . सुरवातीला मनुष्याच्या हितासाठी तयार झालेल्या आणि पर्यावरणाची जपणूक करणाऱ्या ' Green " बँटरीजचे भाषण झाले. या नंतर नविन येणाऱ्या आगंतूक अशा पाव्हण्या बद्दल सखोल चर्चा झाली.त्या नतर आपल्या मुल तत्त्वाला धक्का लावणाऱ्या परंतु अतिशय छोट्या अशा दिसणाऱ्या वस्तूच्या सभोवती सर्व जण गंभीरपणे उभे राहिले. हा नवीन येणारा Device फक्त १० सेकंदात Charge होणार होता . याची कपॕसीटी सध्या अतिशय कमी आहे. किंमत खूप आहे वगेरे बाबींची चर्चा झाली. मिटिंग मधून बाहेर पडताना सर्व जण  त्याला वेगवेगळ्या बाजूने  हाताळून पहात होते आणि अतिशय गंभीरपणे बाहेर पडताना  सर्वांच्या मध्ये त्याचीच चर्चा होती .ज्याचे नाव आहे  "Super Capacitor"!
            विनायक जोशी (vp)
                २० जून २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा