सोमवार, २२ फेब्रुवारी, २०१६

Soldering एक कला !

// श्री स्वामी समर्थ //
   " Soldering "
Soldering ही अतिशय सुंदर आणि अवघड कला आहे. याच्या मध्ये  टिन किंवा  लीड आहे का ? याच्या मधून बाहेर निघणारा धूर घातक आहे का ? वगैरे प्रश्न पडायच्या आधीच मी चांगले
  Soldering करायला शिकलो.  १९८३ साली कंपनीमधे कामाला लागल्या नंतर पहिल्याच महिन्यात "चारुहास आलेगावकर "या मुलाने तयार केलेला one micro second ची अचूकता मोजणारा counter उघडून बघितला . पिसिबी आणि वायरींग soldering चा तो आदर्श नमुना होता.अत्यंत तेजस्वी असा Soldering चा तो अविष्कार होता. बरोबर २० वर्षांनी म्हणजे  २००३ मधे त्या  काउंटर मधील Soldering तसेच चैतन्य दायी होते. Soldering करताना डाव्या हाताचा  आंगठा आणि पहिल्या बोटात Solder धरायचे आणि करंगळी आणि अनामिकेने  कंपोनंटला आधार द्यायचा. उजव्या हाताने soldering करायचे.solder चा ठिपका मारणे आणि ते थंड होण्यासाठी वेळ देणे इथेच जातिवंत कलाकार मंडळींचा खेळ चालू होतो. चांगले Soldering म्हणजे काय असा प्रश्न खरगपूर IIT मधून आलेल्या केंकरे सरांना विचारले आणि त्यांनी शुद्ध मराठीत २५ पाने  Soldering बद्दल लिहून दिली होती. नारायण देशपांडे या बहाद्दरांने Soldering केलेले CPU card हे मशिनवर तयार केलेले नाही आहे याची खात्री करण्यासाठी विदेशी पाहूणे आमच्या येथे येऊन खात्री करुन गेले. Soldering हे कांपोनंट आणि पीसीबी यांच्या मधील कायमचे नातेसंबंध जुळवणारा महत्त्वाचा दुवा आहे .
विनायक जोशी (vp)
6 October 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा