// श्री स्वामी समर्थ //
" मोर "
अगदी पहिल्यांदा मोराचे दर्शन प्राणी संग्रहालयात झाले. पिसारा फुलवून लांडोर नावाच्या बायको समोर जो नाचतो तो मोर हा समज अजूनही कायम ठेवला आहे. सोलापूरला बसने जाताना भिगवणच्या अलिकडे मोर किंवा हरीण हे रस्ता ओलांडून जाताना दिसत असत.. गुजरात मधे पालनपुर या गावात आनंद डेयरी मधे गेलो होतो.प्रचंड उन्हाळा होता.
या वेळी पाळीव प्राणी असावे तसे घरोघरी मोर आले होते.त्यांना घासातला घास आणि पाणी सर्व जण देत होते..या नंतर मात्र मोरांची सुंदर मुलाखात नारायणच्या जाफराबाद मधील अतिशय सुंदर आणि टुमदार अशा काँलनी मधे झाली .या ठिकाणी अत्यंत निर्भयपणे शेकडो मोर त्यांचा दैनंदिन कार्यक्रम पार पाडत होते.आपल्या कडे घराच्या वळचणीला 'पारवे' असतात तसे प्रत्येक बंगल्याच्या आवारात किंवा रस्त्यावर यांची वस्ती होती. जाफराबाद मधे घराच्या अंगणात हातात पोळी घेऊन आई बसलेली असे त्या वेळी हळुवारपणे येऊन मोर ती पोळी घेऊन जात असत.या वेळी पहिल्यांदा त्यांच्या कणखर चोचीचे जवळून दर्शन घडले. रस्त्यावर मधोमध पिसारा फुलवुन मोर ऊभा असेल तर त्याचा आदर राखून कडेकडेने लोकांची वर्दळ चालू असे. आपल्या येथे मोराची चिंचोळी या गावात सुध्दा असंख्य मोरांना स्थानिक मंडळींनी जपले आहे. पालनपूर आणि जाफराबाद या दोन्ही ठिकाणी तेथिल लोकांचे आणि मोरांचे नाते बघितले कि "मोर" हा भारताचा राष्ट्रीय पक्षी का आहे हे कळते !
विनायक जोशी (vp )
29 November 2015
electronchikatha.blogspot.com
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१६
" मोर "
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा