// श्री स्वामी समर्थन //
"अदृश्य दणकट भिंत"
"Optical Isolation"
जम्मू पासून तूतिकोरीन पर्यंत आमची ॲटोमॕटिक पॕकेजिंगची मशिन्स उत्तमपणे चालत होती. केंद्र सरकारने सर्व प्रकारचा अभ्यास करुन polythene बँग मधे खाण्यास योग्य असे oil भरायला परवानगी दिली होती. फक्त oil भरण्यासाठी वेगळ्या प्रकारचा पेपर वापरावा लागणार होता आणि oil हे ठराविक उष्णतामान ठेवून भरावे लागणार होते. मशिनचा वेग दुधाच्या मशिन पेक्षा खूपच कमी असणार होता.आमच्या मूळ मशीन मधे पिशवी व्यवस्थित सिल होण्यासाठी काही बदल करावे लागले होते. आम्हाला पहिली आॕर्डर मद्रास आँइल मिलची मिळाली होती. जाड पेपर रोल आमच्याकडे पुरेसा नसल्यामुळे सरळ गिऱ्हाईका कडेच ट्रायल्स घ्यायचे ठरले. आमची इलेक्ट्रॉनीक प्रणाली कमी व्होल्टेज वरती म्हणजे पाच व्होल्ट वरती चालणारी होती. Customer कडे trials चालू असतानाच आमचा कंट्रोलर व्यवस्थित चालत नाहीये हे लक्षात आले.नवीन दूसरा कंट्रोलर घेउन आमचा इंजिनियर तेथे गेला . तोही तेथे चालला नाही. दुधाच्या मशिनसाठी याच प्रकारचे पाचशे पेक्षा जास्त कंट्रोलर चालू अवस्थेत होते. साइट वरती बरेच दिवस गेल्यावर लक्षात आले की oil भरायसाठी वापरला जाणारा जाड पेपर आणि रबर रोलर यांच्या घर्षणामुळे अतिशय जास्त voltage चा Static Charge तयार होत होता. त्या मुळे कंट्रोलर बंद पडत होता. वेगवेगळ्या प्रकारचे बदल करुन बघितले जात होते. शेवटी मशिन वरील सर्व signals हे 24 व्होल्टस आणि opto coupler च्या सहाय्याने कंट्रोलरला जोडायचा उपाय योग्य ठरला. या नंतर मात्र मशिन अतिशय उत्तम चालू लागले.या अनुभवा नंतर पुढील सर्व मशिन्स मध्ये मशिन वरुन येणारे किंवा जाणारे signals opto coupler मधूनच नेण्याचे ठरवले. Infra ray या संकल्पने वर चालणाऱ्या opto coupler ने त्या नंतरच्या हजारो controller ना भयमुक्त आयुष्य प्रदान केले. या एका प्रसंगा नंतर सर्व डिझाईन्स मधे opto coupler नावाच्या अदृश्य भिंतीला कायमचे आदराचे स्थान मिळाले.
विनायक जोशी (vp)
26 September 2015
electronchikatha.blogspot.com
शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१६
Optical Isolation अदृश्य भिंत !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा