शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

पाळीव प्राणी " कुत्रा "

// श्री स्वामी समर्थ //
   "  पाळीव प्राणी कुत्रा "
काहिही कळत नसूनही न कंटाळता कान ताठ करुन आणि शेपटी हळूवार पणे हलवत जो आपले बोलणे ऐकतो आणि कळले आहे असे दाखवतो  तो म्हणजे पाळीव कुत्रा . आठ ते दहा तास विरह झाल्यावर प्रचंड धुसमुसळेपणाने आणि प्रेमाने गुरगुराट करतो . दारावरची बेल वाजली की कान टवकारुन मालकाचे संरक्षण करायला सिद्ध  होतो. घरातल्या लहान मुलांनी आणि वृध्द मंडळींनी काहीही केले तरी सहन करणारा. अगदी मध्यरात्री जरी आपण ऊठलो तरी आपल्या बरोबर हेलपाटे घालणारा . मालकाच्या मनातील सर्व स्पंदने अचूक जाणणारा  वगैरे वगैरे म्हणजे पाळीव कुत्रा . रेबीज मुळे काय होते किंवा त्याच्या असंख्य गळणाऱ्या केसांच्या मुळे होणारे रोग वगैरे बाबतीत अज्ञान असणे अत्यंत हितकारक असते. या जन्मात कमीतकमी काही हजार वाक्यांचा संवाद ज्याचा बरोबर होणार आहे असा खास मित्र म्हणजे कुत्रा . 
कुत्रा कोणताही असो त्याला Pedigree पाहिजे का पोळी पाहीजे हा मुद्दा गौण आहे त्याला फक्त प्रेम आणि विश्वास यांचीच भाषा समजते. कोणत्याही परिस्थितीत तुम्ही एकटे नाही आहात हे भुंकून सांगणाऱ्या  समस्त  श्वान पथकाला म्हणजेच राजा , राँबी , काळ्या , शेरा ...... वगैरे मंडळीना सलाम !!!
विनायक जोशी ( vp)
28 October 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा