गुरुवार, २५ फेब्रुवारी, २०१६

" रंग आणि तरंग "

// श्री स्वामी समर्थ //
" रंग - तरंग "
'colours - wavelength'
रंगाची ईमेज ही त्याच्या वरती पडणारा प्रकाश आणि त्याच्या मधून निघणाऱ्या  तरंगांच्या बद्दल आकलन करणाऱ्या डोळ्यातील Receptors वरती अवलंबून असते वगैरे तांत्रिक पुस्तकी  ज्ञानाची पहिली झलक हाय स्पिड मशिन वरती काम करताना तपासून बघता आली. या प्रत्येक मशिन वरती बरेच इलेक्ट्रॉनीक डोळे किंवा  Photo eye बसवलेले असतात. अतिशय वेगाने जाणारे रंगाचे ठिपके टिपणे आणि त्या प्रमाणे योग्य उपाययोजना अत्यंत कमी वेळात करणे ही निरंतर कामगिरी ते सातत्याने करत असतात.Printing Technology अति प्रगत करण्यात या रंगित ठिपक्यांचा आणि इलेक्ट्रॉनीक डोळ्यांचा सिंहाचा वाटा आहे.कँरीयर , माँड्युलेशन आणि डी-माँड्युलेशन चा वापर करुन , मशिन चालू असतानाच सतत corrective actions यांच्या मुळे घेता येतात. इलेक्ट्रॉनीक डोळा किंवा  Photo eye बनविण्यासाठी इलेक्ट्रॉनीक्स , फीजीक्स , आॕप्टिक्स आणि मेकॕनिकल वगैरे  गोष्टींची खोलवर माहिती लागते. स्थिर आणि चल गोष्टींच्या  बद्दल चांगलाच अभ्यास लागतो.अर्थातच सहजासहजी डोळ्यांना न दिसणाऱ्या अनावश्यक  तरंगा पासून दूर रहाण्यासाठी precision filters ची माहिती करुन घ्यावी लागते  . एकदा तुम्ही या रंगांच्या आणि त्यातून निघणाऱ्या तरंगांच्या अद्भुत जगात प्रवास अवश्य करा.
विनायक जोशी (vp)
5 October 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा