शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

आनंदाचे तरंग अर्थातच हसणे !

// श्री स्वामी समर्थ //
        " हसणे "
आयुष्याची सुरवात आणि शेवट रडणे या विधीने करणाऱ्या माणसाला आयुष्य आनंदाने जगण्यासाठी परमेश्वराने दिलेली ही दैवी देणगी आहे. माझ्या सुदैवाने मला हा वारसा आईच्या कडून मिळाला. अत्यंत मोकळेपणानं साध्या साध्या गोष्टीतील आनंद हुडकून त्यावर हसणारे मित्र मिळाले.कोणत्याही कलेत निपुणता मिळविण्यासाठी लागते ती म्हणजे बारकाईनं निरीक्षण करायची शक्ती आणि अत्यंत बळकट अशी स्मरणशक्ती . टायमिंगचा खोलवर अभ्यास .स्वतः वरती होणारे विनोद सहन करायचा खिलाडूपणा हवा. समोरच्या माणसाला नाउमेद करण्यासाठी याचा वापर कधीही करु नये. आपल्या आजूबाजूला  विनोदाची कारंजी उडवणारे सहकारी असतील तर ते मागच्या जन्मीचे पुण्य आहे असे समजावे. अत्यंत एकाग्रतेने काम करण्यासाठी "हसणे" हे फार मोठे टाॕनिक आहे. फक्त ठराविक उच्च अभिरुचीच्या विनोदांनाच हसायला पाहिजे असा कोणताही निश्चय करु नये. गडगडाटी हसायला येणारी भाग्यवान मंडळी अत्यंत निरोगी असतात.या गडगडाटा चे सहावे Harmonics हे रडणे असते. त्या मुळे हसणे आणि रडणे एकत्र झाल्याने आरोग्य छान राहते. सर्व जगाची एकच बोलीभाषा असलेल्या "हसणे " या आनंदाने रहायला प्रवृत्त करणाऱ्या विधीला मनापासून धन्यवाद !!
    विनायक जोशी (vp)
      11 August 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा