गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

लाॕलीपाॕप आणि मोटो E

// श्री स्वामी समर्थ //
" लाँलीपाँप "
"मोटो E पहीली आवृत्ती "
बरोबर एक  वर्षापूर्वी बजेट मधे बसणारा म्हणून हा फोन घेतला. गेली ५२ वर्षे ताठ मानेने जगलो हे वाक्य त्या दिवशी भुतकाळात गेले. बरोबर एक महिन्यात मी वाकलेला पाठीचा कणा आणि खाली घातलेली मान अशा अवस्थेत या फोनबरोबर बराच वेळ घालवू लागलो.काल रात्री सहन शक्ती बघणारा असा तीन तासांचा "लाँलीपाँप " अपडेट नावाचा विधी पार पाडला. अतिशय उत्तम कँमेरा असल्यामुळे मुंगी पासुन ते डोंगरां पर्यत बरेच फोटो काढून खुपशा मंडळींना हैराण केले. आता कोणतीही चांगली गोष्ट दिसली कि त्यातली विशेषता वगैरे किरकोळ गोष्टी लक्षात ठेवून मेंदू मधील मेमरी भरु देत नाही.प्रत्येक गोष्ट पाचव्या मिनिटांत जुनी वाटू लागते. नायगारा धबधबा आणि नळाला आलेले पाणी  तितक्याच स्थितप्रज्ञपणे बघण्याची दिव्य दृष्टी या मोबाइल मुळे मिळाली.. या मोबाइलला स्पर्शाची जाणीव असलेला  पडदा असल्यामुळे आपण त्या पडद्याला स्पर्श केल्यावर काहीच घडले नाहीतर कमालीचे अस्वस्थ वाटते. पूर्वी झोपण्यापूर्वी सर्व गावांना  मनानेच एक चक्कर असायची . मुंबई ,कलकत्ता ,कोल्हापूर ,कराड, मेलबर्न,स्विडन , सोलापूर वगैरे हिंडावे लागे .आता मात्र काही सेकंदात सर्वांची खुशाली कळते. अगदी लहानपणापासून आतापर्यत ज्या मंडळींच्या मुळे आपले आयुष्य समृद्ध झाले त्यांची गाठ पडते आहे.
आपले आयुष्य या मोबाइल बरोबर अतिशय आनंदाने घालवायचा सर्वात उत्तम मार्ग म्हणजे 'प्रतिसाद' . हा "प्रतिसाद"  मात्र स्वतःचा स्वतः  ऐकायला शिकलात की अपेक्षाभंगाच शेवाळ न साचता आपण आनंदाने राहू शकतो.
       विनायक जोशी (vp)
            २६ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा