रविवार, ७ फेब्रुवारी, २०१६

" हास्य सम्राट " दिपक देशपांडे !

// श्री स्वामी समर्थ //
      " हास्य सम्राट "
   दिपक शंकर देशपांडे
आपल्या सर्वांच्या घराघरात "Z" मुळे हा पोचलेला आहे. इयत्ता  ८ वीत असताना तो आमच्या काँलनीत रहायला आला. त्यांचे एकत्रित कुटुंब होते.
याचे वडील अतिशय उत्तम गणिताचे शिक्षक होते.तसेच ते उत्तम चित्रकार होते. कठपुतळीचे खुप प्रकारचे खेळ ते करत असत. सर्व बाहुल्या ते स्वतः निरूपयोगी वस्तूंची योग्य जुळवाजुळव करून तयार करत असत. दिपक वरती या सर्व गोष्टीचा खुप प्रभाव होता.
अतिशय गजबजलेले घर असूनही तो "उत्तम चित्रे "
काढत असे.  त्याची आई अत्यंत कष्टाळु आणि धार्मिक आहे. २०१४ च्या डिसेंबर मधे एका लग्नाच्या निमित्ताने आमची भेट झाली त्या वेळी त्याने सांगितलेली गोष्ट याप्रमाणे सांगत आहे.
सांगलीला "शातिनिकेतन" येथे तो Art Teacher Diploma करण्यासाठी गेला होता. शक्यतो
शिक्षण स्वकमाईतून करावे अशी त्याची इच्छा होती. या साठी "वऱ्हाड निघाले लंडनला" हा एकपात्री कार्यक्रम
त्याने बसवला होता. सोलापूर मधील एका  मोठया माणसाने त्याला आमंत्रण दिले होते .सर्व तयारी करुन तो  पहिला कार्यक्रम करण्यासाठी आला .इथे आल्यावर
त्याला कार्यक्रम रद्द झाल्याचे कळाले.
तो अतिशय काळजीत असताना औदुंबराच्या पारावर
बसलेल्या माझ्या आईला त्याने सर्व सविस्तर सगळी हकिकत सांगितली .आईने आमच्या काँलनीमधील
सर्वांना बोलावुन आमच्या गच्चीवरती दिपकचा पहिला  एकपात्री कार्यक्रम अतिशय उत्साहाने आणि योग्य मोबदला देऊन पार पाडला !
   आमची काँलनी आणि आमचे घर त्याच्या सर्व कष्टांचे आणि यशाचे साक्षीदार आहेत. आता त्याने उत्तम असे घर बांधले आहे. लहानपणी मोठ्या बाहुलीचा पोशाख घालून लहान मुलांना हसवणारा हा " विदूषक "आज हास्याच्या दुनियेचा राजा आहे .

             विनायक जोशी (vp)
                ३० मे २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा