सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६

ध्येयवेड्यांच्या जगात !

// श्री स्वामी समर्थ //
  " वेड्यांच्या जगात "
  नायक्रोम  या कंपनीमधे अनेक जिगरबाज मंडळींचा राबता होता.UDCT मधून केमिकल इंजिनियर झालेला मनुष्य COEP मधील बडवेंबरोबर काम करून इलेक्ट्रॉनीक Doctor म्हणून काम करत होता , पूर्ण कंपनी ज्यांना "बाबा"म्हणून हाक मारत असे तो मेकँनिकल इंजिनियर   General manager होता, IIT खरगपूर मधून इलेक्ट्रॉनीक इंजिनियर  झालेला माणूस शेतकऱ्यांना Automatic भरणारी पिशवी या विषयी ज्ञान देत होता. इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेला माणूस कंपनीमधे Technical Head होेता , मेटलर्जी मधील इंजिनियर Marketing सांभाळत होते. सर्वांना कोणत्याही क्षेत्रात वावरायला पूर्ण मुभा होती. Shop floor च्या फरशीवर मशीन समोरच बरेचसे बदल खडूने समजावून सांगितले जात. स्वतःची छान casting बनविण्यासाठी Foundry होती , मिलींग चा विभाग होता. सर्व सुविधा युक्त shop floor होते, अतिशय उत्तम अशी electronic ची शाखा होती. महागडी Test equipment लागली तर शेजारी COEP होते , optical गोष्टींसाठी काहीही  मदत लागली तर University चे Physics Department होते. या कंपनीमधे सर्वात महत्त्वाचे म्हणजे नविन कल्पना मांडायचा अधिकार कोणालाही होता.
अतिशय उत्तम , व्यवहारी ,पाॕझीटीव्ह विचारसरणी असलेली उत्तम आणि ध्येय वेड्या लोकांची टिम होती.
      विनायक जोशी (vp)
         ६ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा