// SSS //
" पहिला विमान प्रवास "
माझा पहिला विमान प्रवास हा अतिशय अपेक्षाभंग करणारा होता. विमानाने थोड्याच वेळात ढगांची रेषा पार केली आणि ढगांच्या पलिकडे सर्व "देव" रहातात या कल्पनेला तडा गेला. विमान ढगांमधून जाताना पुण्यातील खाचखळगे पार करताना बसतात तसे धक्के बसत होते. फक्त कमी वेळात होणारा प्रवास एवढाच आनंद . कधीहि विमानतळावर गेलो की रनवे वरून एका मागून एक उडणारी विमाने बघत बसे. एयर इंंडीया मध्ये तांत्रिक विभागात काम करणारा सुहास वाटवे हा आमचा मित्र बाहेरच्या देशात जाणाऱ्या विमानांचे पूर्ण पणे चेकिंग करून सुरक्षीत प्रवासाची खात्री देत आहे.अतिशय उत्तम दर्जाची आपली तांत्रिक टिम आहे. बाकी विमान हा शब्द जरी ऐकला तरी पहिली आठवण येते आमच्या सर्व मित्र मंडळींच्या मधून भारतीय वायुदलाकडे अत्यंत यशस्वी Takeoff घेणाऱ्या "अजित सोन्न " याची. याच्या ऐका यशस्वी झेपेमुळे आम्ही उरलेल्या १२ जणांनी आत्मविश्वासाने आपापल्या क्षेत्राकडे आनंदाने आणि उत्साहाने Takeoff केले.
विनायक जोशी (vp)
१३ जूलै २०१५
electronchikatha.blogspot.com
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६
माझा पहिला विमान प्रवास
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा