// SSS //
" छोटा भिम "
" Relay "
छोटा भिम म्हणाल्यावर जसा आपल्याला आनंद होतो तसाच हा आहे.मी पहिल्यांदा याला बघितले तेंव्हा तो आणि काँईल नावाची त्याची बहीण हातात दोन फुलबाज्या घेऊन ठिणग्यांची आतषबाजी करत होते. हा सगळा खेळ एका पारदर्शक अशा छोट्या घरात चालू होता. या घराच्या आत धूर कोंडून गुदमरायला लागू नये म्हणून छोट्या छोट्या खिडक्या होत्या ."करंट" नावाचा मित्र या काँईल ला भेटायला आला की दोघे मिळून आतिशय वेगाने स्वतःभोवती फिरत असत आणि याचवेळी त्या पारदर्शक घरात चैतन्याचे magnetisum पसरवत , याचमुळे एकमेकांशी न बोलणारे 'open contacts' सुध्दा गळाभेट घेतात.दोन अत्यंत भिन्न प्रकृतीचा मंडळींना आनंदात आणि दीर्घकाळ एकत्र ठेवायचे काम हे "रीले" करतात. दोघांपेक्षा जास्त जण जवळजवळ आले तर मात्र पारदर्शक घरांमुळे यांना एकमेकांशी बोलून सुखदुखांची देवाणघेवाण करता येते. बाह्य जगात चालू असलेल्या अनेक धक्यांपासून अतिसंवेदनशील अशा कंट्रोल सिस्टीमचे वर्षानुवर्षे हा न कंटाळता संरक्षण करत आहे.
विनायक जोशी ( vp)
9423005702
१५ जूलै २०१५
सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६
Relay उर्फ छोटा भीम
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा