शनिवार, २० फेब्रुवारी, २०१६

गायछाप जर्दाचे !!!

// श्री स्वामी समर्थ //
      ' गायछाप  जर्दा "
    हा आरोग्याला घातक असा तंबाखूचा प्रकार आहे.
माझ्या आयुष्यात Computer , Google अथवा TV यांचा शिरकाव झालेला नव्हता त्या काळात 'गायछाप' खाणारे बरेच सिद्ध पुरुष माझ्या आयुष्यात आले. पुस्तकांच्या पलिकडे खूप मोठे जग आहे याचा साक्षात्कार झाला. पुण्यात रहायचे असल्यामुळे या तंबाखूने  पुण्यासाठी 'गायछाप'हे सात्त्विक नाव धारण केले आहे. साधारणपणे प्रत्येक ५० कि.मी वरती हीचे नाव बदलत गेले आहे. शक्यतो शारीरिक कष्टाची कामे किंवा मेकँनिकल Machines  वरती कोणाशीही न बोलता अथवा एकाग्रता  पूर्वक कामे करताना कोणी दिसले की स्वारींनी 'गायछाप'चा 'बार' लावला आहे असे समजावे. अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच या समाधी अवस्थेतून त्यांना बाहेर काढावे.
सर्वधर्म समभाव वाढवणारी आणि सर्व आर्थिक गटातील लोकांना एकाच आनंदी  स्तरावर ठेवणारी अशी हिची किमया आहे.
मी स्वतः हिचा परीचय करुन घेतला नाही परंतु हिचे उपासक असलेले आणि अतिशय उत्तम काम करणारे माझे खुप मित्र आहेत.
' गायछापचा' चा वापर 'साधन' म्हणून जे ' साधक ' करतात त्यांचे अपेक्षित ' साध्य 'आणि उत्तम आरोग्य त्यांना परमेश्वराने दिले पाहीजे हिच इच्छा !!
          विनायक जोशी (vp)
               २० जून २०१५
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा