// श्री स्वामी समर्थ //
" इंजेक्शनची बाटली "
Dr.Reddy's lab नावाच्या कंपनीने अत्यंत महत्त्वाचे आणि महागडे असे
इंजेक्शन बाजारात आणायची तयारी केली होती. या मधील प्रत्येक थेंब अतिशय मौल्यवान होता. या बाटल्या ॲटोमॕटीक मशीन वरती भरुन आमच्या मशीन मध्ये येणार होत्या .प्रत्येक बाटलीचे २५० मिली सेकंदात वजन करुन सहा पैकी योग्य अशा conveyor वरुन बाटल्या पुढे पाठवणे या साठी आम्ही मशीन बनवले होते. या निमित्ताने Vial , Ampules वगैरे गोष्टींची माहिती कळत होती. या साठी अत्यंत वेगवान आणि अचूक असा "मेटलर " या जर्मन कंपनीचा बॕलंन्स वापरला होता. वजना प्रमाणे वेगवेगळ्या सहा ठिकाणी बाटल्या पाठविणे अपेक्षित होते. अर्थातच एका मिनीटात २०० बाटल्या जाणार होत्या .आमची सर्व मदार अत्यंत महाग आणि अचूक अशा जर्मन बॕलंन्स वरती होती. आॕन लाईन वजन सोडून इतर सर्व मेकॕनिझम ची पहिल्यांदा चाचणी घेतली. आमच्या कंपनीमधील एक नवीन आणि चुणचुणीत असा मुलगा न कंटाळता आमच्या आणि जर्मन बॕलंन्सची दोस्ती जमवत होता. सलग दोन महीने काम केल्या नंतर अतिशय उत्तम अशा प्रकारे मशीन चालू लागले. सर्व प्रकारची चाचणी झाल्यावर मशीन हैद्राबादला रवाना झाले. अतिशय प्रिसिजन अशा या मशीन वरती software चे काम करणारा अजित बेलसरकर हा या project नंतर पुढील शिक्षणा साठी आमच्या येथून industrial कोटया मधून "IIT खरगपुर" येथे गेला. Discovery चॕनल वरील Mega Factories कार्यक्रमात अतिशय वेगाने जाणाऱ्या बाटल्या बघून आठवण आली ती या आमच्या उत्तम चालणाऱ्या मशीनची व मेटलर या जर्मन बॕलंन्सची आणि अर्थातच सहज पणे "IIT "चा अभ्यासक्रम पूर्ण करुन अमेरिकेत गेलेल्या पुसदच्या "अजित बेलसरकरची" !!!
विनायक जोशी (vp)
5 August 2015
electronchikatha.blogspot.com
शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६
इंजेक्शनची बाटली
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा