शुक्रवार, १९ फेब्रुवारी, २०१६

जिनियस केशव आलूर

// श्री स्वामी समर्थ //
      " जिनीयस केशव "
"Interview तीन शब्दांचा "
पुण्याच्या सहकारनगर जवळ संतनगर मध्ये  खळदकर बंगल्यात आमचे R & D unit होते. सध्याच्या Treasure park च्या इथे एक मोठी विहीर आणि रिकामे मैदान होते. R&D मधे काम करण्यासाठी आम्हाला एक Software  Engineer घ्यायचा होता. बरेच candidates येत होते . या मधे एक साधारणतः सावळा आणि विरळ केस असलेला आणि अतिशय साधे कपडे घातलेला candidate सुध्दा आला  होता . चेहऱ्यावर फक्त सौम्य हसू .
त्याला नाव काय हा प्रश्न विचारला आणि उत्तर आले "केशव आलूर". गावाचे नाव धारवाड.  तो सिलेक्ट झाला पुढचा एकही प्रश्न न विचारता .
"आलूर "हे धारवाड मधील अतिशय हूशार म्हणून नावाजलेले घराणे होते. पहिली पासून Degree पर्यत सर्व परीक्षेत पहिले येणारे असा त्यांचा लौकिक होता . त्या काळात त्यांची स्पर्धा फक्त "आलूर" मंडळींशी होत असे. आम्हाला हिरा मिळाला होता,
तो जाॕईन झाला आणि अर्थातच नवनवीन कामांचा फडशा पाडायला लागला . कधीकधी कामात अडथळा आला कि आम्ही  विहिरीच्या  जवळ निवांत गप्पा मारत बसत असू . या अवांतर गप्पा म्हणजे R&Dच्या मंडळींना चांगलाच बदल असतो.
एकदा मी बंगलोरला गेलो असताना TIFR मधे जाऊन  त्याच्या साठी "floating point calculations  in assembly " हे पुस्तक घेऊन  आलो होतो.
साधारणपणे दोन वर्षांनी त्याला एका मोठ्या कंपनीचा काॕल आला. तेथून तो Honeywell आबुधाबी ला गेला. गेली १५ वर्षे तो तेथेच आहे. दोन वर्षापूर्वी अचानक पत्ता हुडकत  रात्री  ११ वाजता घरी आला. मुलाला IIT entrance  class साठी इथे  घालायचे म्हणून तो पुण्याला आला होता.
अर्थातच यावेळी अतिशय आनंदी अशा  कालखंडाच्या आठवणी निघाल्या भरपूर हसलो.
आता कधी  सीमाभागाचा विषय निघाला की म्हणावेसे वाटते  बेळगावचा जसा "कुंदा" , निपाणीची "तंबाखू " तसेच धारवाडचे पेढे नव्हेत तर फक्त "आलूरच"
         विनायक जोशी
      10 June 2015
electronchikatha.blogspot.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा