सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६

Algorithm

// SSS //
" Algorithm"
परमेश्वराने प्रत्येक माणसाला एक वेगळी आणि वैशिष्टयपूर्ण अशी आत्मिक समाधान देणारी देणगी दिलेली असते.
आमच्या कडील काही अतिशिक्षीत,शिक्षीतआणि अशिक्षित अशा सर्व मंडळीच्या मधे फक्त एक ते दोघे जण असे होते की जे मशीनचे मूळ Designers नसून सुध्दा त्यांना मशीन तयार होण्यापूर्वी खुप स्पष्ट पणे मशीन चालताना दिसत असे.  मशीन मधील pneumatic, hydraulic,electrical,electronics,polythene papers वगैरे विषयाचे त्याला समतोल आणि व्यावहारिक ज्ञान असे.
Algorithm हा अत्यंत जबाबदारीने आणि आतिशय लवचिक पणाने वापरता येईल असा ठेवलेला असे. साधारणपणे electronic आणि pneumatics या वेगवान मंडळींनी मेकँनिकल आणि hydraulic सारख्या अतिशय दणकट आणि सावकाश चालणाऱ्यांना सांभाळून  त्याच्या बरोबरीने चालणे अभिप्रेत असे. मशिन च्या trials  च्या वेळी बाह्य साधनांच्या कमतरतेमुळे आपल्या कडे असलेल्या सर्व ज्ञानेंद्रियांचा पूर्ण वापर करावा लागे. आलेल्या अनुभवांचा Thumb rule म्हणून सर्व जण वापर करत असत.
साधारणपणे दोन ते तिन पानांमधे  लिहलेल्या  Algorithm चे वाचन झाले की त्या मशीनचे लाँजिक आयुष्यभरासाठी लक्षात रहायचे.
            विनायक जोशी (vp)
             9423005702
             २ जून २०१५

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा