// श्री स्वामी समर्थ //
" डायोड आँरींग "
डीजीटल इलेक्ट्रॉनीक्स अतिशय उत्तम पणे समजावून सांगायचे काम "Malvino "च्या पुस्तकाने केले.या मधे लाँजीकल गेट च्या रुपात पहिल्यांदा दोन डायोड एकमेकांच्या जवळ हातात हात घालून "आँर" गेट म्हणून उभे दिसले.दोघे मिळून किंवा कोणीही एकजण दिलेली जबाबदारी पार पाडत होते. या नंतर मात्र तब्येत सुधारलेल्या अवस्थेत पाँवर डिझाईन्स मधे बँक अप चे काम करताना दिसले.या इथे मात्र दोघेही अर्धे अर्धे काम वाटून समजूतदार पणाने करत होते.दोघांच्या मधील एकजण जरी दमला तरी आजिबात वेळ न दवडता दुसरा दोघांचे काम एकटा करत असे.या इथे मात्र कामाचा भार जास्त असल्यामुळे स्वारी थोड्या गरम झालेल्या आसत. या नंतर मात्र अँनलाँग डिझाईन्स मधे भेट झाली त्या वेळी हे एकाच्या खांद्यावर दुसरा असे उभे दिसले . आतिशय उत्तम आणि स्वस्त अशा अँनालाँग करंट बँकअप देणारे म्हणून उभे होते. डीजीटल डिझाईन्स मधे मँचच्या आधी चर्चा करायला उभे असलेल्या खेळाडूं सारखे उभे रहात. हेच डायोड अँनलाँग करंट च्या डिझाईन्स मधे दहीहंडी खेळताना करतात तसे दोन थर करुन उभे होते. हे दहिहंडी खेळायला आलेले आहेत हे कळायला मात्र त्यांच्याच गावातील "आप्त" लागतात.!!
विनायक जोशी (vp)
9423005702
18 August 2015
सोमवार, १ फेब्रुवारी, २०१६
Diode Oring
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा