// श्री स्वामी समर्थ //
" कुरकुर "
प्रत्येक माणसाला शारीरिक आणि मानसिक दृष्टीने आरोग्य संपन्न ठेवणारी अशी ही "कुरकुर".
हिचा आनंद घेण्यासाठी कमीतकमी दोन माणसे आणि जास्तीत जास्त कितीही चालतात.
माझ्या लहानपणी अजित सारखीच बॕट मला पाहिजे अशा कुरकुरीने मी "कुरकुरीचा"श्री गणेशा केला होता. नंतर शाळेला कमी असलेल्या सुट्या , जास्तीचा अभ्यास , जेवण होण्याच्या आधीच न घातलेल्या अंथरुणा बद्दल
, परीक्षा लवकर आली म्हणून , सुट्टी लवकर संपल्यावर , बारीक कटींग केली म्हणून , कंपनीमध्ये नको ते काम करावे लागले म्हणून , सुट्टी
मिळाली नाही म्हणून , आजारी पडल्यावर , इंजक्शन बघितले की, रेल्वे उशीरा आली,गर्दी जास्त आहे, चुकीच्या ठिकाणी गाडी लागली की, वगैरे वगैरे.
परवा तर नविन कोल्हापूरी चपलांमधून पाहीजे तसा "करकर" आवाज येत नव्हता म्हणून कुरकुर, पाणी आले नाही की, आलेले पाणी वाया घालवले म्हणून , असे असंख्य प्रकारे हि कुरकुर आपल्या बरोबर असते.
मला Oxygen शिवाय आपण जगू का नाही याची कल्पना नाही . पण "कुरकुरी "शिवाय जगणे अशक्य !
विनायक जोशी (vp)
२८ मे २०१५
electronchikatha.blogspot.com
सोमवार, १५ फेब्रुवारी, २०१६
कुरकुर
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा